हवेत फिरली तलवार ! 'तु मुझे पैसे मांगता क्या,' म्हणत माजविली दहशत; 07 जणांविरुद्ध गुन्हा

shivrajya patra

सोलापूर : हवेत तलवार फिरवत, 'तु मुझे पैसे मांगता क्या,' असे म्हणून अजहर शेख, ऊर्फ गोल्डन याने शिवीगाळ करुन दहशत निर्माण केली. तो फिरवत असलेली तलवार साहिल शेख यास उजव्या हाताच्या दोन बोटांमध्ये लागली. ही घटना कुर्बान हुसेन नगरातील डेक्कन मोटारसमोर असलेल्या कट्यावर सोमवारी रात्री घडली. हातात तलवार, हॉकी स्टिक, लोखंडी रॉड आणि काठी घेऊन राडा केलेल्या 07 जणांविरुद्ध गुन्हा करण्यात आलाय.

कुंभारी येथील गोदुताई परूळेकर विडी घरकुलातील रहिवासी आसीफ अब्दुल रजाक दंडू व त्याचे मित्र दारुल कजा संस्थेच्या बाहेरील कट्यावर बसले असताना, हातात तलवार, हॉकी स्टिक, लोखंडी रॉड आणि काठी घेऊन आलेल्या 07 जणांनी तू अजहर शेख ऊर्फ गोल्डन याला कुमठा नाका इथं पैसे का मागितला म्हणून शिवीगाळी करून दहशत निर्माण केली.


अजहरच्या हातातील फिरत असलेली तलवार साहिलच्या उजव्या हाताच्या दोन बोटामध्ये लागली. त्यावेळी तेथून पळून जात असताना आसीफ दंडू याला खाली पाडून 07 जणांनी लाथा-बुक्याने मारहाण केली. त्याच्या तक्रारीनुसार अजहर शेख, तोहिद विजापूर ऊर्फ पैलवान, रेहान शेख, अजगरअली कुरेशी, कुरेशी याचा भाऊ नाव माहित नाही आणि अजहर शेख ऊर्फ गोल्डन याचे दोन भाचे नाव माहित नाही या आरोपींविरूध्द सदर बझार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोहेकॉ/1277 काळे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.
To Top