मोहोळ : तालुक्यातील नरखेड येथे झालेल्या तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये 14 वर्ष मुलीच्या गटातून इंग्लिश स्कूल बेगमपूर प्रशालेतील इयत्ता 06 वी मधील जिया जाकीर चौधरी व कशिश शब्बीर पठाण या दोघींनी प्रथम क्रमांक मिळविला. या दोघींची जिल्हा कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली.
यशस्वी विद्यार्थ्यांना राजू माने व क्रीडा शिक्षक ज्ञानेश्वर मेटकरी यांचं मार्गदर्शन लाभले. सर्वांचे संस्थेचे अध्यक्ष अॅड सुजित कदम, उपाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, सचिवा प्रियदर्शनी महाडिक, संचालिका डॉ. मीनाक्षी कदम, संचालिका तेजस्विनी कदम, सहसचिव श्रीधर भोसले, प्रशालेचे मुख्याध्यापक कल्याण भोसले, पर्यवेक्षक दिलीप चंदनशिवे यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
