विशेष जीवन गौरव पुरस्कारासाठी रत्नदीप कांबळे यांची निवड
सोलापूर : महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाचे जिल्हास्तरीय गुणवंत पत्रकार, गुणवंत शिक्षक आणि गुणवंत कर्मचारी पुरस्कार पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले. यंदाचं पुरस्कार वितरणाचे 10 वर्षे असून रविवारी, 28 सप्टेंबर रोजी सोलापुरातील शिवस्मारक सभागृहात सकाळी ठिक 10.30 वाजता या पुरस्कारांचं होणार असल्याचे महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर यांनी सांगितले.
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर गुणवंत पत्रकार पुरस्कार
1) किरण किसन बनसोडे (उपसंपादक- दैनिक तरुण भारत) सोलापूर.
2) किशोर पिराजी सोनवणे (मुख्य संपादक: P.M. News 1166) वैराग, ता. बार्शी.
विशेष जीवन गौरव पुरस्कार
1) रत्नदीप नागनाथ कांबळे (संचालक, सद्संकल्प शिक्षण व समाजसेवा संस्था तसेच संचालक, नवयान अर्बन को. ऑप. क्रेडीट सोसायटी, सोलापूर)
क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार
1) प्राचार्य अमोल दिगंबर ढेपे (श्री. दिगंबरराव विश्वनाथ ढेपे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय बाळे, ता. उत्तर सोलापूर.
2) प्राचार्य आप्पासाहेब धर्मराज काशीद (श्री. अशोकराव देसाई कृषी विद्यालय, आलेगांव, ता. सांगोला
3) प्राचार्य शरद गेना सांवत (माळशिरस प्रशाला, कला आणि वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय माळशिरस
4) महेंद्र तुकाराम शिंदे (मुख्याध्यापक- सिध्दनाथ विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय पाटखळ, ता. मंगळवेढा.
5) राजनकुमार पांडुरंग पौळ (सहशिक्षक- प्रगती विद्यामंदिर मांगी, ता. करमाळा. 6) बलभीम आजिनाथ हांडे (सहशिक्षक- तांबोळे विद्यामंदिर तांबोळे, ता. मोहोळ.
7) धनाजी कोंडीबा धिमधिमे (सहशिक्षक- शोभाताई दिलीपराव सोपल विद्यालय घाणेगांव, ता. बार्शी.
8) भीमराव गोरख नवगिरे (सहशिक्षक- श्री विठ्ठल प्रशाला व विज्ञान महाविद्यालय, वेणुनगर ता. पंढरपूर.
9) अंकुश रामा जाधव (सहशिक्षक- आ. बबनराव शिंदे प्राथमिक शाळा कुर्डूवाडी, ता. माढा.
10) गंगाधर भीमाशंकर शिवशरण (सहशिक्षक- नुतन विद्यालय मंगळूर (पान), ता. अक्कलकोट.
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले गुणवंत मुख्याध्यापिका पुरस्कार
1) सौ. मंजुश्री कृष्णदेव खंडागळे (मुख्याध्यापिका- राष्ट्रसंत प्राथमिक शाळा, सोलापूर.
2) प्रतिभा जोतीराम पांडव (सहशिक्षिका- मातोश्री माध्यमिक विद्यालय म्हैसगांव, ता. माढा.
राजर्षी शाहू महाराज गुणवंत कर्मचारी पुरस्कार
1) शिवाजी गजेंद्र धिटे (वरिष्ठ लिपिक- कै. शंकरराव बाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अनगर, ता. मोहोळ.
2) मुस्ताक रहिमान शेतसंदी (वरिष्ठ लिपिक- महात्मा फुले विद्यालय मंद्रुप ता.द. सोलापूर.
3) सुनिल दगडू सगरे (लिपिक- सिल्व्हर ज्युबिली प्रशाला, बार्शी.
4) कैलास श्रीरंग माने (सेवक- विश्वभूषण विद्यालय, सोलापूर.
पुरस्कार वितरण प्रसंगी सत्कार मुर्तीचा सहकुटुंब सत्कार करण्यात येणार असून सन्मानचिन्ह, शाल, वृक्षाचे रोपटे व ग्रंथ असं पुरस्काराचे स्वरुप आहे.
यावेळी राज्य सरचिटणीस बोधिप्रकाश गायकवाड राज्य उपाध्यक्ष, रमेश लोखंडे, उपप्राचार्य प्रकाश शिंदे, जिल्हाध्यक्ष प्रा. युवराज भोसले, जिल्हा सचिव रवी देवकर, जिल्हा सहसचिव डॉ. राजदत्त रासोलगीकर, शिवाजी जगताप (मोहोळ), उत्तर सोलापूर तालुकाध्यक्ष नितीन भारत गायकवाड, प्रा. अभिजित भंडारे आदि उपस्थित होते.
