चालकांचे प्रश्न आणि समस्या मार्गी लावण्याचे शासन दरबारी प्रयत्न सुरू : रियाज सय्यद

shivrajya patra
निमित्त चालक दिनाचं ! 28 जिल्ह्यातील 60 चालकांचा प्रमाणपत्र-सन्मान चिन्ह देऊन गौरव 

सोलापूर : आज मितीला  चालकांसमोर  सेवा वा व्यावसायिक स्पर्धेबरोबर अनेक समस्या आहेत. त्या समस्यांवर प्रकाश टाकताना ई-चलन आणि इतर मागण्यांसंदर्भात महासंघ शासन दरबारी आगामी काळात पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन वाहतूक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद यांनी केले. 

चालक दिनाचे औचित्य साधून येथील बेरिया सभागृहात बुधवारी, 17 सप्टेंबर  रोजी सायंकाळी, 'ना कोणत्या पक्षाचा, ना कोणत्या धर्माचा, महासंघ फक्त चालकांचा.' या ब्रिद वाक्याला घेऊन कार्य करित असलेल्या वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या 04 थे राज्यस्तरीय चालक रत्न पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन केले. या कार्यक्रमात सोलापुरसह राज्यातील 28 जिल्ह्यांमधील 60 चालकांचा प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. त्यात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडील 10 चालकांचाही समावेश आहे. त्यामध्ये दोन कर्तबगार महिला रिक्षा चालकांचा समावेश आहे. तसेच मौलाली चौक, आणि शहीद अश्फाकउल्लाह खान रिक्षा स्टॉपला शिस्तबद्ध रिक्षा स्टॉपचा पुरस्कार देण्यात आला. 

महासंघाचे महासचिव प्रदीप शिंगे यांनी प्रास्ताविकातून उपस्थितांचे स्वागत केले. इलियास सिद्दिकी यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केले. याप्रसंगी चेतन नरोटे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. वाहतूक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते

पुढील दोन महिन्यांत वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या मालकीचे ‘माझी रिक्षा’ ॲप लॉन्च होणार असल्याची घोषणा रियाज सय्यद यांनी केली. या ॲपमुळे प्रवाशांना एका टचवर रिक्षा उपलब्ध होईल आणि प्रत्येक रिक्षाचालकाला दररोज किमान एक हजार रुपयांचा व्यवसाय मिळेल, असा विश्वासही अध्यक्ष स्थानावरून बोलताना त्यांनी व्यक्त केला.

प्रमुख पाहुणे चेतन नरोटे म्हणाले, रियाज सय्यद यांच्या नेतृत्वाखाली ही संघटना केवळ रिक्षा चालकांच्या आर्थिक आणि सामाजिक सुरक्षेसाठी काम करत नाही, तर त्यांच्या कुटुंबीयांसाठीही आधारवड आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे रिक्षा चालकांना न्याय मिळवून देण्यात यश आले आहे. या उपक्रमामुळे वाहतूक क्षेत्रातील एकजूट वाढेल, असा विश्वास नरोटे यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी मंचावर रिफाह फाऊंडेशनचे अध्यक्ष फयाज सय्यद, इरफान शेख, वारीस कुडले, जमीर शेख, अप्पासाहेब लंगोटे, महिपती पवार, श्री पारखे, शफी पटेल, लाडजी नदाफ, हजरत शेख, अहमद बाबा, सलाऊद्दीन शेख, जमीर शेख, इब्राहिम जमादार, अल्ताफ पटेल, अयाज शेख, गणी पठाण, हारिस कुरेशी, मुन्ना बेलीफ, हाजी सालीक, दौला कुमठे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 

चालकांच्या कार्याचा गौरव करणारा हा समारंभ उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला. याप्रसंगी सर्व प्रवर्गातील चालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रदीप शिंगे, इमरान शेख, इरफन कल्याणी, अल्लाबक्ष शेख, देविदास कोळी, शंकर राऊत, रमेश बनसोडे, मनोहर खांडेकर, नागेश वाघमारे, आसिफ शेख,अफसर शेख, गौस शेख, असलम शेख, सालिक हाजी साब, फिरोज तांबोळी, जुबेर शेख, मिनाज बागवान आदींनी परिश्रम घेतले.

... चौकट 

... हा सन्मान नाहीतर चालक भगिनींसाठी प्रेरणा

पतीचं निधन झाल्यानंतर मी रिक्षाची स्टेअरिंग हातात घेतली अन् मुंबईच्या रस्त्यावर मी रिक्षा चालवली. हा पुरस्कार माझ्यासाठी केवळ एक सन्मान नाही, तर माझ्या कुटुंब आणि सर्व रिक्षा चालक बहिणींसाठी एक मोठी प्रेरणा आहे.

- महिला रिक्षाचालक सारिका सुळे, माळशिरस

    (चालक रत्न पुरस्काराच्या मानकरी) 

To Top