सोलापूर : कुमठे प्रशालेत नुकतेच शासकीय रेखाकला ग्रेड परीक्षा व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून लिटल स्टार इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका शुभांगी पवार होत्या. कुमठे प्रशालेचे पर्यवेक्षक वसंत गुंगे अध्यक्षस्थानी होते.
व्याख्याते म्हणून राज्य शैक्षणिक कलाशिक्षक संघाचे राज्य अध्यक्ष शेरशाह डोंगरी, व सोलापूर जिल्हा शैक्षणिक कला शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत सदाफुले उपस्थित होते. या प्रसंगी प्रशालेचे पर्यवेक्षक यांनी मार्गदर्शन करताना वाचनात आलेल्या चित्रकलेविषयी अनेक अनुभव सांगितले.
त्यानुसार आपणही चित्रकार व्हावे , कला जोपासावी. परीक्षेत सर्वांनी चांगले यश प्राप्त करावे, अशा शुभेच्छा दिल्या. मान्यवरांच्या हस्ते व्याख्याते शशिकांत सदाफुले व शेरशाह डोंगरी यांचा सत्कार करण्यात आला. प्रशालेचे कलाशिक्षक शांतप्पा काळे यांनी मार्गदर्शक, प्रमुख उपस्थितांचे आभार मानले.


