नूतन सहाय्यक कामगार आयुक्त यलगुंडे यांचा संघर्ष समितीच्या वतीने सत्कार

shivrajya patra

सोलापूर : येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात निलेश यलगुंडे यांनी नूतन सहाय्यक कामगार आयुक्त म्हणून पदभार घेतला. त्यानिमित्त महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीच्या वतीने, त्यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करून, त्यांना पुढील कार्यकिर्दीस शुभेच्छा देण्यात आल्या.

याप्रसंगी विष्णू कारमपुरी, सोहेल शेख, रेखा आडकी, विठ्ठल कुराडकर, बालकिसन गोणे, गुरुनाथ कोळी, श्रीनिवास बोगा, पप्पू शेख, आदी उपस्थित होते.

To Top