08 शाळा चार महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थीनींचा सहभाग
सोलापूर : सोलापूर शहरातील सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळाच्या वतीने शहरातील विविध शिक्षण संस्था प्रामुख्याने सोलापूर विद्यापीठाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या एन एन सी विद्यार्थी विद्यार्थीनींसह आपल्या भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ तसेच गेली आठ-दहा वर्षांत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरल्यामुळे आवाज अतिशय वाढल्याने त्याचा दुष्परिणाम होऊ लागले. तसेच लेझर शो च्या प्रखर उजेडामुळे डोळ्यावर गंभीर परिणाम होऊन अंधत्व आले आहे, तसेच व लहान बाल वृध्द व्यक्ती पशु-पक्षी, प्राणी यांच्यावर यामुळे जिवांना मुकण्याची वेळ आली आहे, असे कर्कश आवाज डोळ्यांवर गंभीर परिणाम होणारे वाद्य कायमस्वरूपी बंद झालेच पाहिजे आणि पारंपारिक वाद्यांच्या गजरात सर्व उत्सव-सण या पुढे साजरा झाला पाहिजे, अशा जनहितार्थ रॅली चे प्रारंभ दत्त चौक येथून ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज यात्रेचे मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांच्या हस्ते श्रीफल फोडून करण्यात आले. 
ही रॅली पुढे राजवाडे चौक, नवी पेठ, गंगा विहीर चौपाड, श्री मल्लिकार्जुन मंदिर, बाळीवेस, टेलिफोन भवन, चाटी गल्ली, क्रांती चौक, सराफ बाजार, मधला मारुती, माणिक चौकमार्गे श्री आजोबा गणपती मंदिर येथे विसर्जित करण्यात आली. 
या रॅलीत जवळ-जवळ दिड ते दोन हजार शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षक नागरिक तिरंगा ध्वज, विविध प्रकारचे घोष वाक्य नामफलक घेऊन सहभाग घेतला. श्री आजोबा गणपती बाप्पा ची विधीवत पूजा करून आरती करण्यात आली. या रॅलीचा समारोप सामुदायिक राष्ट्रगिताने झाली.
अग्रभागी श्री दणाणे बॅडपथक देशभक्ती श्री गणेशाचे बहादार गाणे सादरीकरण केल्यामुळे सारेजण भारावून गेले होते. या रॅलीत सर्वश्री ट्रस्टी सहभागी झाले होते. पोलिस प्रशासनाचे अनमोल सहकार्य लाभले. 
श्री आजोबा गणपती मंदिर ट्रस्टीच्या वतीने सर्व मध्यवर्ती महामंडळाच्या ट्रस्टी चे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या रॅलीत पुढील शिक्षण संस्थेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक सहभागी झाले होते.
याप्रसंगी उत्सव अध्यक्ष सोमनाथ मेंडके, ट्रस्टी अध्यक्ष बसवराज येरटे, ट्रस्टी दास शेळके, सुनिल रसाळे, अंबादास गुत्तीकोंडा, संजय शिंदे, विजय पुकाळे, मल्लिनाथ याळगी, गौरव जक्कापुरे, विष्णू मुधोळकर, श्रीमती लता फुटाणे, विनायक महिंद्रकर, अशोक कलशेट्टी, गणेश चिंचोळी, कु. हेमा चिंचोळकर, शिवानंद येरटे, दिलीप पाटील, आकाश हरकुड, अशोक उपाध्ये, मल्लिनाथ सोलापुरे, विरेश सक्करगी, अक्षय बिद्री, बाबा शेख यांची उपस्थिती होती.
