02+ 48 आरोपींना उत्सव कालावधीत मिरवणूक क्षेत्रातून बाहेर निघून जाण्याचा आदेश पारित

shivrajya patra

सोलापूर : शहरात सार्वजनिक गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद साजरी होत आहे. या उत्सवाच्या अनुषंगाने पोलीस आयुक्तालय, सोलापूर शहर येथील विविध पोलीस ठाणे हद्दीतील दोन वा दोन पेक्षा जास्त गुन्हे असणाऱ्या 48 आरोपीतांना भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कलम 163 (2) प्रमाणे 05 ते 07 सप्टेंबर या कालावधीत मिरवणूक क्षेत्रातून बाहेर निघून जाण्याचा आदेश पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे यांनी पारित केला आहे. 

या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर प्रभावी कायदेशीर कार्यवाही करण्यासंबंधी संबंधित आरोपी तसेच संबंधित पो. स्टे. प्रभारी अधिकारी यांना सुचित करण्यात आलं असल्याची माहिती प्रतिबंधक कारवाई कक्षाचे पोलीस उपनिरीक्षक विक्रम रजपूत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली.

To Top