जिजाऊ ज्ञान मंदिरच्या विद्यार्थ्यांची तलवारबाजी-योगासन स्पर्धेत भरारी; विभागीय स्पर्धेसाठी निवड

shivrajya patra

उत्तर सोलापूर : महाराष्ट्र राज्य अंतर्गत शालेय योगासन स्पर्धा व तलवारबाजी स्पर्धा युवक संचालनालय, पुणे विभाग यांच्या वतीने राजीव गांधी इनडोअर स्टेडियम येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेमध्ये तालुक्यातील जिजाऊ ज्ञान मंदिर, कोंडी शिक्षण संकुलातील आविष्कार प्रसेनजित काटे या विद्यार्थ्यानं 14 वर्ष वयोगटामधून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला. त्याची विभागीय योगासन स्पर्धेसाठी निवड झालीय.

तलवारबाजी (फाईल) या प्रकारात 19 वर्षीय मुलीच्या गटामध्ये विजयसिंह मोहिते पाटील कनिष्ठ महाविद्यालय कोंडी येथील सबा एजाज शेख हिने फाईल या तलवारबाजी या प्रकारात गोल्ड मेडल पटकावून गरुडझेप घेतलीय.

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलामध्ये विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी विशेष लक्ष दिले  अनेक विद्यार्थ्यांनी यावर्षी विविध स्पर्धांमध्ये नेत्रदीपक यश प्राप्त केलं आहे. दोन्ही खेळाडूंनी संपादन केलेल्या यशामुळे त्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे. 

या निवडीबद्दल संस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष गणेश निळ, प्राचार्या सुषमा निळ, प्रा. नवनाथ भोसले, प्रा. वैभवी कुंभारी, दादासाहेब नीळ व क्रीडा शिक्षक दिलीप भोसले यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

To Top