जिल्हाधिकारी भेट : नागरिकांसाठी आठवड्यातील 'हे' दिवस आणि वेळ दुपारी 04 ते सायं. 06 वा. पर्यंत

shivrajya patra

सोलापूर : जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे नियमितपणे प्रत्येक आठवड्याला सोमवार व शुक्रवारी दुपारी 04.00 ते सायंकाळी 06.00 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय येथे अभ्यागतांना भेटत असतात. परंतु जिल्ह्यातील काही नागरिकांना जिल्हाधिकारी यांच्या भेटीच्या वेळा माहीत नसल्याचे निदर्शनास आलेले आहे.

तरी या प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांना कळविण्यात येते की, जिल्हाधिकारी हे नेहमीप्रमाणेच प्रत्येक आठवड्याच्या सोमवारी व शुक्रवारी सर्वसामान्य नागरिकांना दुपारी 04.00 ते सायंकाळी 06.00 या वेळेत त्यांच्या अडीअडचणीच्या अनुषंगाने भेट देतील. 

तरी जिल्ह्यातील नागरिकांनी याची नोंद घ्यावी व प्रत्येक सोमवारी व शुक्रवारी दिलेल्या वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

To Top