धमकी प्रकरण : उपमुख्यमंत्री यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी बेमुदत धरणे आंदोलन

shivrajya patra

सोलापूर : उपविभागीय पोलिस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या सरकारी कामात हस्तक्षेप, अडथळा आणि धमकी दिल्या प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या (जुने) प्रवेशद्वारावर बेमुदत धरणे आंदोलनास प्रारंभ झालाय. पत्रकार सैपन अमीनसाब शेख असं आंदोलकाचं नांव आहे. राज्यात प्रशासनातील अधिकाऱ्यांचं मनोबल खच्चीकरण घटनेचा निषेध म्हणून हे आंदोलन सुरू आहे, असं शेख यांनी सांगितले.

31 ऑगस्ट रोजी घडलेल्या घटनेत, करमाळा पोलीस ठाण्याच्या उपविभागीय अधिकारी अंजना कृष्णा अवैध मुरूम उपसा प्रकरणी त्यांचं कर्तव्य बजावत असताना, अवैध उपसा करणाऱ्या गाव-गुंडांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित पवार यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधून ही पोलीस कारवाई रोखण्यासंबंधी कळविले. त्यावेळी उभयतांमध्ये झालेलं संभाषण प्रसार माध्यम अन् सामाजिक माध्यमावर राज्यानं पाहिलं व ऐकलं आहे. 

हा प्रकार संतापजनक तितकाचं निषेधार्ह आहे. हा संपूर्ण प्रकार प्रामाणिक अधिकाऱ्यांचं मनोबल खच्चीकरण करणारा आहे. या 'दादा' गिरीचा नि:ष्पक्ष जनतेने निषेध नोंदविला. 

या प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री पवार यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याची मागणीसाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आल्याचे पत्रकार तथा आंदोलक सैपन शेख यांनी सांगितले.

To Top