सोलापूर : जश्ने ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त शेळगी येथील एच.एम. सामाजिक संघटनेच्यावतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात सुमारे 80 रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. या रक्तदान शिबिराचे रक्तसंकलन सोलापूर ब्लड बँक यांनी केले.
यावेळी प्रमुख पाहुणे माजी नगरसेवक प्रथमेश कोठे, किरण देशमुख, केदार उंबरजे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज मुलाणी, पोलीस निरीक्षक शबनम शेख, पोलीस उपनिरीक्षक संतोष येडे, ज्ञानेश्वर, जुबेर बागवान, 
खालीद मणियार, सुलेमान चामाकोरा, सरफराज बागवान, कारभारी हजरत शेख, एच.एम. सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हुसैन मौलासाब बागवान उपस्थित होते. 
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सादिक हुंडेकरी, तोफिक बागवान, ताजबाबा शेख, मौला शेख, चांद दखनी, निसार बेलमे, जुबेर मुल्ला, रजाक नालवार, अमान बागवान, उबेद बागवान, मिरदे इब्राहिम बागवान, माजीद पटेल, फेरोज बागवान तसेच परिसरातील नागरिक व इतर कार्यकर्ते उपस्थित होते..
