... अन्यथा 08 सप्टेंबरपासून आझाद मैदान येथे आमरण उपोषण : विश्वभूषण कांबळे

shivrajya patra

सोलापूर : वरिष्ठांनी कारवाई करण्याचे पत्र दिले असतानाही कर्तव्यात कसूर केलेले सोलापूर महापालिका आयुक्त, नगर अभियंता, सार्वजनिक आरोग्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता उप अभियंता, शाखा अभियंता, यांना तात्काळ निलंबित करावं आणि संबंधित ठेकेदारांवर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा सोमवारी, 08 सप्टेंबरपासून आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती आर.बी. दयावान संस्थेचे विश्वभूषण कांबळे यांनी शनिवारी एका पत्रकार परिषदेत दिली.

सोलापूर महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी विविध बारा योजनेअंतर्गत अधिकाऱ्यांच्या संगनमतातून जवळपास 100 ठेकेदारांनी सुमारे 100 टक्के विकास कामांमध्ये जवळ-जवळ अडीच हजार कोटीचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप विश्वभूषण कांबळे यांनी भरगच्च पत्रकार परिषदेत केला.

या प्रकरणात गुंतलेल्यांवर कारवाई हयगय केलेल्या संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी. या मागणीसाठी सोमवारी, 08 सप्टेंबरपासून मुंबई आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्यात येणार आहे, असा इशारा आर. बी. दयावान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे सचिव विश्वभूषण कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.

सन 2021 ते 25 या दरम्यान विविध बारा शासकीय योजनांतर्गत शहरात विविध ठिकाणी सुमारे 100 ठेकेदारांनी विविध विकासकामे केली आहेत. या 100 टक्के विकास कामांपैकी सुमारे 70 टक्के कामे वास्तवात झालीच नाहीत. केवळ कागदपत्रे कामे दाखवून दिले उचलण्यात आले आहेत तर उर्वरित कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत. 

अशा या विविध कामांमध्ये सुमारे अडीच हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करताना, याप्रकरणी संस्थेच्या वतीने गेल्या तीन वर्षापासून पाठपुरावा सुरू असल्याचं विश्वभूषण कांबळे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

सोलापूर महापालिका आयुक्त आणि सार्वजनिक बांधकाम विभाग अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांना कारवाई संदर्भात वेळोवेळी निवेदन दिले. इतकेच नव्हे तर याप्रकरणी कारवाईसाठी 08 दिवस आमरण उपोषण करण्यात आले होते. त्यावेळी लेखी स्वरूपात आश्वासन दिले, मात्र अद्यापही कारवाई केली नाही. 

संबंधित मक्तेदारांना नोटीस देण्यात आली आहे. हेच काम या अगोदर झालेले आहेत. याची डी एल पी संपली नसताना देखील हे काम केले, असं दाखवण्यात आले आहे, परंतु जागेवर हे काम झालेच नसून नोटीस देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असंही त्यांनी शेवटी म्हटले. 

या पत्रकार परिषदेस युवराज पवार, कांता बनसोडे, विश्वरत्न कांबळे, वैभव शिंदे, आदी उपस्थित होते.

To Top