सोलापूर : बुधवारी रात्री मुसळधार पावसाने सोलापूर शहर आणि परिसराला अक्षरशः झोडपून काढलं. त्यामुळं शहराला जोडणाऱ्या अनेक रस्त्यावर व नागरी वसाहतीचा संपर्क खंडित झाला होता. अशा स्थितीत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व आपत्कालीन परिस्थितीला तातडीने प्रतिसाद देण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेतर्फे आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यरत ठेवण्यात आला आहे.
मुसळधार पाऊस, पूरस्थिती, इमारत दुर्घटना, आग, झाडे पडणे, नाले व गटारांची तुंबणूक, तसेच इतर कोणत्याही नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीच्या प्रसंगी नागरिकांना मदत करण्यासाठी हा कक्ष तत्पर आहे.
या कक्षाशी संपर्क साधण्यासाठी खालील दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत :
1800 233 1916 (टोल फ्री क्रमांक)
0217–2735293
नागरिकांनी आपत्ती अथवा अडचणीच्या वेळी वरील क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्षामध्ये २४ तास आपत्कालीन सेवेसाठी कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून, प्राप्त होणाऱ्या तक्रारी अथवा माहितीवर तात्काळ कार्यवाही केली जाणार आहे.
सोलापूर महानगरपालिका नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध असून, कोणतीही आपत्तीजन्य घटना घडल्यास विलंब न लावता महानगरपालिकेशी संपर्क साधावा, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी केलं आहे.
