जनसंघाचे संस्थापक सदस्य विठ्ठलराव न्हावकर यांचे निधन
सोलापूर : जनसंघाचे संस्थापक सदस्य, टिळक चौक येथील सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव नारायणराव न्हावकर यांचं गुरुवारी, 11 सप्टेंबर रोजी रात्री वृध्दापकाळात निधन झाले. ते मृत्यूसमयी 89 वर्षीय होते.
वसंत विहार परिसरातील बलदवा हॉस्पिटल च्या पाठीमागील गिरीजा नगर येथील सोनचाफा या निवास स्थानापासून अंत्ययात्रा निघून त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी, सकाळी 11 वाजता रुपाभवानी चौकाजवळ लिंगायत स्मशान भूमी इथं अंतिम संस्कार होतील, असं सांगण्यात आलंय.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, भारतीय जनता पार्टीचे संस्थापक सदस्य, येथील शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे सचिव, गणेशोत्सव व नवरात्र मध्यवर्ती महामंडळाचे ज्येष्ठ सदस्य म्हणूनही त्यांची ओळख आहे. ते रावजी उपाख्य नामाने सर्वदूर परिचित होते.
त्यांच्या पश्चात आठ मुले, दोन मुली, दोन जावई, चार नात जावई, वीस नातवंडे व दोन पतवंडे असा परिवार आहे.
यवतमाळ येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नागेश न्हावकर व माजी जिल्हा सरकारी वकील संतोष न्हावकर, संघाचे जेष्ठ सदस्य महादेव न्हावकर यांचे ते वडील होत.
