सोलापूर : सामान्य नागरीकांना दमदाटी, मारहाण करुन दहशत निर्माण करणे, साथीदारांसह घातक शस्त्र जवळ बाळगून मारहाण करणे, साथीदारांसह गोरगरीब जनतेला दमदाटी करुन अडवणूक करुन पैशांची मागणी करणे यासारखे गुन्हे दाखल असलेल्या अशोक दशरथ सामल (वय-46 वर्षे) याला पोलीस आयुक्तालयाने सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार केले. सामल याच्या तडीपारीनंतर त्यास शेजारच्या विजापूर जिल्ह्यात सोडण्यात आले.
अक्कलकोट रस्त्यावरील गांधी नगरातील रहिवासी अशोक सामल याचेविरुध्द सन २०१४, २०१५, २०१९, २०२० व सन २०२५ या कालावधीमध्ये अनेक गुन्हे दाखल असल्याने एमआयडीसी पोलीस ठाण्याकडून त्याच्याविरुद्ध तडीपारीचा प्रस्ताव पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) यांना सादर करण्यात आला होता.
त्या अनुषंगाने पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) श्री विजय कबाडे यांनी कार्यवाही करुन अशोक सामल यास सोलापूर व धाराशीव जिल्ह्यातून दोन वर्षाकरीता तडीपार केलं आहे.
