पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली या बस गाड्यांचे समावेशामुळे सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या कार्यक्षमता व गतिमानतेत मोठी भर पडणार आहे. सोलापूर ग्रामीण हा जिल्हा क्षेत्रभळाच्या दृष्टीने मोठा असल्याने लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी, महत्वाच्या बंदोबस्ताकरिता, कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या काळात तसेच आरोपींच्या पार्टी पोलीस पथकासोबत सुरक्षितरित्या हलविण्यासाठी या बसेस उपयुक्त ठरणार आहेत. मोठ्या संख्येने अधिकारी व अंमलदार यांना कमी वेळेत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचविणे आता अधिक सुलभ होईल.
सोलापूर ग्रामीण पोलीस दलाकडे अशा आधुनिक प्रवास सुविधांच्या समावेशामुळे विविध आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रतिसाद देणे अधिक वेगवान व परिणामकारक होणार आहे. ग्रामीण भागातील लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही सुविधा महत्त्वाची ठरणार आहे.
याप्रसंगी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांच्यासह उपअधीक्षक (मुख्यालय) शिरीष हुंबे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे (मोटार परिवहन विभाग), पोलीस निरीक्षक व्यंकटेश पालाकृती, (बिनतारी संदेश), पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे (जिल्हा वाहतुक शाखा), पोलीस निरीक्षक दिपक पाटील (नियत्रंण कक्ष), सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे तसेच अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.
