प्रा. तस्नीमबानो वड्डो यांना पीएच.डी. पदवी प्रदान

shivrajya patra

सोलापूर : सोलापूर सोशल असोसिएशन आर्टस् ॲण्ड कॉमर्स महाविद्यालयामधील उर्दू रिसर्च सेंटरची विद्यार्थिनी प्रा. तस्नीमबानो मुर्तुजा वड्डो यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्यावतीने पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली.

प्रा. तस्नीमबानो मुर्तुजा वड्डो यांनी "अनीस चिश्ती: फन और शख्सियत" या विषयावर प्रा. डॉ. गौसअहमद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली आपले संशोधन प्रबंध सादर केले. त्यांचा पीएच.डी. मौखिक परीक्षेला मानवविद्या शाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. वसंत कोरे यांच्या अध्यक्षतेखाली तर बहिस्थ परीक्षक म्हणून प्रा. डॉ. सरदार पाशा यांच्या उपस्थित पार पडले. प्रास्ताविक प्रा. डॉ. गौसअहमद शेख यांनी केले.

संशोधक प्रा. तस्नीमबानो वड्डो यांनी त्यांच्या संशोधन प्रबंधाची सर्वसमावेशक माहिती सादर केली आणि प्रेक्षकांच्या प्रश्नांची तर्कशुद्ध उत्तरेही दिली. या मौखिक परीक्षेचे बहिस्थ परीक्षक प्रा. डॉ. सरदार पाशा यांनी संशोधन प्रबंधाचे खूप कौतुक केले आणि तो प्रकाशित करण्याचा सल्ला दिला.

मौखिक परीक्षेचे अध्यक्ष प्रा. डॉ. वसंत कोरे यांनी "अनीस चिश्ती: फन और शख्सियत" या शोधनिबंधासाठी डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (पीएच.डी.) ही पदवी प्रा. तस्नीमबानो वड्डो यांना प्रदान करण्याची घोषणा केली आणि त्यांचे अभिनंदन केले. 

सोशल महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. इक्बाल तांबोळी यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शेवटी संशोधन मार्गदर्शक प्रा. डॉ. गौसअहमद शेख यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी मोठ्या संख्येने नवीन संशोधक आणि इतर उर्दू प्रेमी उपस्थित होते.

To Top