राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपास रा.स.क.म. संघटनेचा पाठिंबा

shivrajya patra

सोलापूर : राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी/कर्मचारी एकत्रिकरण, महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचारी म्हणून सेवेत कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्याच्या महाराष्ट्र शासनाचा, 14 मार्च 2024 चा शासन निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करावी., तसेच मेह,औरंगाबाद खंडपीठाने अशा कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासनाने कायम करण्यासाठी कार्यवाही करण्याच्या आदेशाची अंमलबजावणी करावी या प्रमुख मागण्यासाठी आणि अन्य महत्वाच्या  करण्यासाठी म्हणून 19 ऑगस्टपासून महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत संप पुकारलेला आहे. 

त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय अभियान आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी पद्धतीवर शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी सोलापुरातील पूनम गेट इथं 19 ऑगस्टपासुन सुरु असलेल्या बेमुदत संपास *राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना जिल्हा शाखा सोलापूर यांच्यावतीने रासकम. संघटनेचे जिल्हा सरचिटणीस राजाभाऊ सोनकांबळे यांच्या हस्ते व कार्याध्यक्ष सी.एस.स्वामी व उपाध्यक्ष सटवाजी होटकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी एकत्रिकरणाचे सोलापूर जिल्हा समन्व्यक डॉ.रोहन वायचळ आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना जाहीर पाठिंबा देत असल्याचे लेखी निवेदन देण्यात आले.

यावेळी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या सोलापूर जिल्हा शाखेचे कोषाध्यक्ष हुसेन बाशा मुजावर, संपर्क प्रमुख शशिकांत भालेराव, मशाक मुजावर, यांच्यासह राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी एकत्रिकरण समितीचे महिला, पुरुष प्रतिनिधी तसेच डॉक्टर, नर्सेस प्रतिनिधी तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी पद्धतीवर सेवेत असलेले अधिकारी/कर्मचारी यांच्यासाह महिला, पुरुष मोठ्या संख्येने या संपात सहभाग झालेले आहेत.

To Top