माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त गान स्पर्धा

shivrajya patra

सोलापूर : माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त सोलापूरमध्ये सुगम गान स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील नवोदित गायक-गायिकांना आपली कला सादर करण्यासाठी ही एक मोठी संधी उपलब्ध होणार आहे.

या स्पर्धेत हिंदी, मराठी भावगीत, भक्तिगीत, गझल व अभंग या प्रकारांचा समावेश असेल. डॉ. निर्मलकुमार फडके सभागृहात गुरुवारी, ४ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता ही स्पर्धा होणार आहे. इच्छुक स्पर्धकांनी त्याच दिवशी डॉ. निर्मलकुमार फडके सभागृह येथे सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत प्रवेशिका नोंदवाव्यात, असे आयोजकांनी कळविले आहे.

या उपक्रमाबाबत अधिक माहितीसाठी प्रशांत देशमुख (९४२०१११९१३) किंवा वैभव गुर्जर (९४२१६६६००९) यांच्याशी संपर्क साधावा, असं आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजनही करण्यात आले आहे. हे प्रदर्शन ४ सप्टेंबरपासून ९ सप्टेंबरपर्यंत दररोज सकाळी ११ ते सायं. ९ वाजेपर्यंत चालणार असून त्याचे उद्घाटन ४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता होईल, असंही यावेळी सांगण्यात आलंय.

To Top