जीएसटी क्रमांक मंजुरी देण्यासाठी स्वीकारली पाच हजार रुपयाची लाच; दोघाविरुद्ध गुन्हा दाखल

shivrajya patra

सोलापूर : नवीन जी.एस.टी क्रमांकास मंजुरी देण्याकरीता तक्रारदाराकडे ५,००० रुपये लाचेची मागणी करुन लाच स्विकारल्याप्रकरणी दोघांविरुध्द विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार वस्तु व सेवाकर कार्यालयात गुरूवारी, २१ ऑगस्ट रोजी घडला. महेश जरीचंद चौधरी, (वय-४१ वर्षे, पद राज्य कर अधिकारी) आणि आमसिध्द इराण्णा बगले (पद-राज्य कर निरीक्षक) अशी लोकसेवक आरोपींची नावं असल्याचं सांगण्यात आले. 

तक्रारदार यांचे मालकीचे कंन्स्ट्रक्शन अॅन्ड सर्विंग फर्म असून सदर फर्मच्या नांवे नवीन जीएसटी क्रमांक मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज केला होता. तो देण्यासाठी महेश चौधरी आणि आमसिध्द बगले  यांनी ५ हजार रुपयांची लाच मागितली. वस्तु व सेवा कर कार्यालया बगले यांनी लाच स्विकारुन ती लाच रक्कम कर अधिकारी चौधरी यांच्या टेबलावरील फाईलखाली ठेवली असताना, या आरोपींताना एलसीबी पथकाने रंगेहात पकडण्यात आले. 

दोन्ही आरोपींविरूध्द गुन्हा नोंद करणेची प्रक्रिया चालू आहे. ही कामगिरी सापळा पथकातील पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले, पोलीस निरीक्षक शैलेश पवार, पोलीस निरीक्षक गणेश पिंगुवाले, पोलीस अंमलदार पोह/अतुल घाडगे, पोह/सलीम मुल्ला पोना/स्वामीराव जाधव, चापोह/राहुल गायकवाड, (सर्व नेम. एसीबी, सोलापूर) यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

To Top