मध्यवर्ती श्रीगणेशोत्सव मंडळाच्या "मध्यवर्ती" कार्यालयाचे डाॅ. किरण देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन; अनेक मान्यवरांची उपस्थिती

shivrajya patra

सोलापूर : सोलापूर शहर सार्वजनिक मध्यवर्ती श्रीगणेशोत्सव मंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवारी, २२ ऑगस्ट रोजी सकाळी मीठ गल्ली येथील शिवानुभव मंगल कार्यालय येथे माजी नगरसेवक तथा भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष डाॅ. किरण देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रारंभी श्री गणेश प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करुन सार्वजनिक मध्यवर्ती श्रीगणेशोत्सव मंडळाच्यावतीने प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल, शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे,भाऊसाहेब रोडगे, कसबा गणपती अध्यक्ष बाळासाहेब मुस्तारे, सिध्देश्वर यात्रेचे मानकरी सागर हिरेहब्बु,आजोबा गणपती ट्रस्टी उपाध्यक्ष शिवानंद मेंडके,आजोबा गणपतीचे ट्रस्टी खजिनदार चंद्रकांत कळमणकर, केदार वनारोटे, प्रफुल्ल झाडबुके यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला.

याप्रसंगी उत्सव अध्यक्ष सोमनाथ मेंडके,ट्रस्टी अध्यक्ष बसवराज येरटे, सुनिल रसाळे, दास शेळके, संजय शिंदे, माजी उत्सव अध्यक्ष विनायक महिंद्रकर, विजय पुकाळे, कैलास मेंगाणे, नंदकुमार उपाध्ये, अशोक कलशेट्टी, विष्णु मुधोळकर, लता फुटाणे, गणेश चिंचोळी, हेमा चिंचोळकर यांच्यासह उत्सव पदाधिकारी व गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी ट्रस्टी सुनील रसाळे आणि दास शेळके यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ट्रस्टी गौरव जक्कापुरे यांनी केले तर उत्सव अध्यक्ष सोमनाथ मेंडके यांनी आभार मानले.

To Top