सोलापूर : कुमठे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात सोमवारी, 04 ऑगस्ट रोजी इयत्ता अकरावी कला व वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. या सर्व नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष दिलीपराव माने, मुख्य विश्वस्त जयकुमार माने, विश्वस्त स्वाती माने व प्राचार्य जयसिंग गायकवाड यांनी शुभेच्छा दिल्या. 
प्रथमतः स्व. ब्रह्मदेव दादा माने यांच्या प्रतिमेचे पूजन करून अकरावीच्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे पर्यवेक्षक वसंत गुंगे, कनिष्ठ महाविद्यालयातील प्रमुख प्रा. संजय जाधव, प्रा. दादाराव डांगे, प्रा. हणमंत शिंदे, प्रा. विजयकुमार वाळके व प्रा. बंडोपंत बाबर यांच्या हस्ते अकरावीच्या विद्यार्थी-विद्यार्थीनींचं स्वागत करण्यात आले. 
याप्रसंगी वसंत गुंगे यांनी कॉलेजबद्दल विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती सांगितली. प्रा. संजय जाधव यांनी कॉलेजच्या शिस्तीबद्दल सर्व विद्यार्थ्यांना कल्पना दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. दीपक शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विनोद थोरात तर प्रा. राजीव निकम यांनी सर्व उपस्थितांचं आभार मानले.
