सोलापूर : येथील एमआयडीसी, कुमारस्वामी नगरातील रहिवासी विश्वनाथ एकनाथ आगाशे यांचं सोमवारी, रेल्वे स्थानकावर घडलेल्या दुर्दैवी घटनेत अपघाती निधन झालं. ते मृत्यू समयी 77 वर्षीय होते.त्यांच्यावर पुणे नाका स्मशानभूमीत रात्री अंत्यसंस्कार होणार असल्याचे सांगण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, विवाहित मुलगी- जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. ते पत्रकार अश्विनी तडवळकर यांचे वडील होत.
