सोलापूर : सेवानिवृत्त पोलीस उप अधिक्षक आणि 'शिवछत्रपतींची धर्मनिरपेक्षता ' या शिवचरित्राचे लेखक शिवचरित्रकार मुसा खान यांचं सोमवारी वृध्दापकाळात निधन झाले. ते मृत्यूसमयी ८२ वर्षीय होते.
पोलीस खात्यात असूनदेखील इतिहास संशोधन करून सामाजिक सलोखा निर्माण करण्यात पुढाकार घेण्यासाठी शिवछत्रपतींचा इतिहास संशोधन करून उर्दू, हिंदी आणि मराठीत लेखन केले. ते उर्दू, हिंदी, इंग्रजीबरोबर फारसी भाषेचे अभ्यासक होते. विपूल संदर्भ पुस्तकांच संच बाळगून होते.
त्यांच्या 'शिवछत्रपतींची धर्मनिरपेक्षता ' या शिवचरित्राचे उर्दू आणि मराठीत तीन आवृत्ती प्रकाशित झाल्या आहेत. यासोबत अनेक दैनिक, मासिक आणि नियतकालिकात लेखन झाले आहे. शिवचरित्रासोबत फुले-शाहू-आंबेडकर या महापुरुषांवर देखील विपुल लेखन केलं आहे. त्यांच्या निधनानं महाराष्ट्रातील बहुभाषिक शिवचरित्रकार आज काळाच्या पडद्याआड गेला असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केलीय.
मंगळवारी, 12 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता मोदी पोलीस चौकीजवळील घरापासून अंत्ययात्रा निघून मोदी स्मशानभूमीत दफन होईल, असं सांगण्यात आलंय.
