पुणे : रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांना सामाजिक कार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल पिंपरी चिंचवड कलाकार महासंघाने 'समाजरत्न पुरस्कार' देऊन नुकतेच सन्मानित केले.
सोहळ्याला जेष्ठ अभिनेते सुनील गोडबोले, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, माजी आमदार विलास लांडे आणि महासंघाचे संस्थापक अध्यक्ष विजयकुमार उलपे यांची उपस्थिती होती
उमेश चव्हाण यांनी रुग्ण हक्क परिषदेमार्फत सरकारी रुग्णालयातील सुविधा, औषधांच्या किंमती आणि वैद्यकीय दुर्घटनांविरोधात केलेल्या आंदोलनांमुळे अनेक रुग्णांना न्याय मिळाला. यावेळी अभिनेते सुनील गोडबोले यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमात अमर पुणेकर, चित्रसेन भवार, गायक चंद्रकांत प्रल्हाद शिंदे, नर्तिका मृणाल कुलकर्णी, गायक राहुल शिंदे, मुराद काझी आणि संगीतकार साजन विशाल यांनी मनमोहक कला सादरीकरण केले.
पुरस्कार स्वीकारताना उमेश चव्हाण म्हणाले की, हा सन्मान माझा नाही, तर रुग्ण हक्क परिषदेच्या प्रत्येक सदस्याचा आहे. रुग्णांच्या हक्कांसाठी आमचा लढा सुरूच राहील, असंही त्यांनी यावेळी म्हटले.
