'लोकमान्य' च्या श्रींची भक्तीभावाने प्रतिष्ठापना

shivrajya patra

सोलापूर : शहरातील पारंपरिक मर्दानी खेळ व लेझीम साठी नावाजलेले पत्रा तालीम तरुण मंडळ व लोकमान्य संयुक्त गणेशोत्सव महामंडळाच्या मानाच्या श्री पणजोबा गणपतीची प्रतिष्ठापना मोठ्या भक्तिभावाने करण्यात आली. 

बुधवारी, पत्रा तालीम येथे मंडळाचे अध्यक्ष आदित्य घाडगे व महामंडळाचे अध्यक्ष दत्ता भोसले ,बापू जाधव, प्रवीण इरकशेट्टी यांच्या हस्ते श्रींची विधिवत पूजा करून प्रतिष्ठापनेचा हा कार्यक्रम पार पडला.

दरम्यान, मंडळाकडून 21 किलो चांदी श्रींच्या चरणी अर्पण करण्यात आली.यावेळी मोरया च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.पत्रा तालीमचे खलिफा पैलवान दत्तात्रय कोलारकर, माजी उपमहापौर पद्माकर काळे, माजी परिवहन सभापती राजन जाधव, श्रीकांत घाडगे, मनोज गादेकर, राजेंद्र घुले, शिवाजी चव्हाण, ॲड. राम कदम, बापू धंगेकर, पैलवान अमर दुधाळ, दद्दु भोसले, बापू दुधाळ, उमाकांत घाडगे ,शिवाजी घुले, उत्तम कोलारकर, पिंटू चव्हाण, पैलवान नवनाथ बन्ने, सचिन स्वामी, देविदास घुले, सुहास कोलारकर,राहुल बनसोडे, ओंकार जाधव, पत्रा तालीम व महामंडळाचे प्रसिद्धी प्रमुख वैभव गंगणे, मिरवणूक प्रमुख सौरभ कन्हेरी, कार्यालयीन प्रमुख प्रवीण जाधव, निशांत सावळे, जलपेश घुले, धनराज शिंदे, कपिल पवार, महेश जगदाळे, मयुरेश घाडगे, ओम घाडगे, किशोर गादेकर यांच्यासह मंडळाचे व महामंडळाचे पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

प्रतिवर्षी वर्षाप्रमाणे पत्रा तालीम युवक मंडळ व लोकमान्य संयुक्त गणेशोत्सव मध्यवर्ती महामंडळाची गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषपूर्ण वातावरणात हजारो गणेश भक्तांच्या लेझीम ताफ्यासह संपन्न होणार आहे.  मंडळाच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक उपक्रमांचंही आयोजन करण्यात येते.

पत्रा तालीम चा लेझीम ताफा पाहण्यासाठी गणेश भक्त सोलापूर शहर-जिल्ह्यासह महाराष्ट्रातून सोलापुरात आवर्जून दाखल होत असतात. गणेश विसर्जन मिरवणुकीचा आकर्षक देखावा आपल्या कॅमेरात कैद करत असतात आणि मिरवणुकीत आनंदात सहभागी होत असतात, हेही मंडळाचं वैशिष्ट्यं म्हणून पाहिलं जातं.

To Top