रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटीला सदस्यवाढीबद्दल जिल्हास्तरीय गौरव
अकलूज : येथे पार पडलेल्या जिल्हा सदस्यता सेमिनारमध्ये रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटीला सदस्यवाढीसाठी सन्मान प्रदान करण्यात आला. हा सन्मान सर्व सदस्यांच्या एकत्रित परिश्रमांचे फलित आहे, असं रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटीचे अध्यक्ष रोट. अकबर नदाफ यांनी म्हटले.
या यशामुळे रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटीने रोटरीचे कार्यक्षेत्र वाढवून नवीन सदस्य जोडण्यात व समाजसेवेचे व्रत पाळण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे. “सेवा हीच श्रेष्ठ” या तत्त्वाशी बांधिलकी जपत क्लबने केलेल्या उपक्रमांची जिल्हास्तरावर दखल घेण्यात आली.
यावेळी क्लबचे अध्यक्ष रोटे. अकबर नदाफ, सदस्य रोटे. भारत कदम, रोटे. तौफिक काझी, रोटे. महेश साळुंके तसेच जिल्हा सचिव राजगोपाल तापडिया, वीरेंद्र फुंडीपल्ले व जिल्हा सदस्यता संचालक सीए नितीन कुदळे उपस्थित होते.
या यशामुळे आम्हाला पुढील काळात समाजसेवा, मैत्रीभाव आणि नेतृत्व विकासासाठी अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळाली आहे, असंही अध्यक्ष रोटे. अकबर नदाफ यांनी सांगितले.
