लातूर : गोरक्षेच्या नावाखाली स्वयंघोषित गोरक्षक शेतकरी, व्यापारी, वाहन चालक, कुरेशी समाज शेतमजूर आणि अल्पसंख्यांक समाजावर हल्ले करीत आहेत. हे हल्ले अन् अत्याचाराला जणू शासनाची अप्रत्यक्षपणे मूक संमती असल्याची जनमाणसांची भावना आहे. हा अन्याय व अत्याचाराच्या विरोधात जमिअतुल कुरैश कमेटी, जिला लातूर च्या वतीने सोमवारी, 18 ऑगस्ट रोजी भव्य मुक मोर्चा काढण्यात आला. यावेळी गोरक्षण छावण्यांतील भ्रष्टाचाराची कसून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.
या मोर्चाला लोकसत्ता युवा संघटना (महाराष्ट्र राज्य) लातूर शहर संस्थापक अध्यक्ष इलाही बशीरसाब शेख, विधानसभा २०२४ अपक्ष उमेदवार तथा सकल मुस्लिम समाज आरक्षण उपोषणकर्ते यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर पाठिंबा देण्यात आला
त्यावेळी अध्यक्ष उमर अ.रहेमान कलाल, जिल्हाध्यक्ष इरफान अ.बारी कुरेशी आणि अन्य पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.
