सोलापूर : लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त, शुक्रवारी महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाच्यावतीने प्रदेश अध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.
यावेळी राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधिप्रकाश गायकवाड, जिल्हा अध्यक्ष प्रा. युवराज भोसले, जिल्हा सचिव रवी देवकर, अनिल जगझाप, सुनिल डांगे, सिद्धेश्वर भुरले, महानंदा शिंदे इत्यादी पदाधिकारी-सभासद उपस्थित होते.
साहित्यरत्न अण्णाभाऊंना बहुजन शिक्षक महासंघाच्या वतीने अभिवादन
https://youtu.be/U2F_avFNO5E
प्रदेश अध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांनी केलेल्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या अतुलनिय कार्याच्या उजाळ्यानं अभिवादन सोहळ्याचा समारोप झाला.
