महापुरुषांच्या विचारांवर पुढं वाटचाल करून विद्यार्थ्यांनी साधावी देशाची प्रगती : मंगला नाईकनवरे-मोरे

shivrajya patra

सोलापूर : लोकमान्य टिळक यांचा बाणेदारपणा आणि साहीत्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य वाचलं पाहिजे, या महापुरुषांच्या विचारांवर पुढं वाटचाल करून आपल्या राज्याची पर्यायानं देशाची प्रगती साधली पाहिजे, असं मत राष्ट्रविकास च्या मुख्याध्यापिका मंगला नाईकनवरे-मोरे यांनी मांडले. 

येथील राष्ट्रविकास प्राथमिक विद्यामंदिरात शुक्रवारी, लोकमान्य टिळक यांचा स्मृतिदिन आणि लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.

याप्रसंगी ज्युनिअर कॉलेजचे प्रा. संजय जाधव व  भारती कुलकर्णी, मंजुश्री जमखंडीकर, जनाबाई आवताडे आदी शिक्षक उपस्थित होते. प्रारंभी इ. पहिली ते चौथीमधील विद्यार्थी-विद्यार्थींनींनी महापुरुषांबद्दल विचार व्यक्त केले. यावेळी मुख्याध्यापिका मंगला नाईकनवरे बोलत होत्या. आपल्यात धाडस आल पाहिजे, यासाठी वाचन संस्कृति जतन करा, असा संदेशही त्यांनी यावेळी दिला. 

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नयना कंडारकर, अनुबाई सुगुरे, मनीषा आवताडे यांनी परिश्रम घेतले.  यावेळी सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांचन कुलकर्णी यांनी केले तर सोनाली जाधव यांनी सर्व उपस्थितांचं आभार मानले.

To Top