सोलापूर : सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन माजी आमदार दिलीपराव माने यांच्या वाढदिवसानिमित्त कुमठे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले.
पोलीस दलात कार्यरत असलेले कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी परशुराम लांबतुरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य जयसिंग गायकवाड, पर्यवेक्षक वसंत गुंगे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख संजय जाधव, वृक्षप्रेमी नारायण कदम, कोळी इतर सर्व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी प्रा. संजय जाधव यानी लाबंतुरे यांचा परिचय करुन देताना, त्यांनी गेल्या दहा वर्षांत वृक्ष लागवड करताना 11 हजार झाडे लाऊन ते संगोपनाचे महत्वाचे कार्य केले. झाडीची भिशी चालवून दानशुर व्यक्तिंकडून झाडे घेऊन जोपासली. आज आपल्या सोलापूरमध्येच नव्हे तर कर्नाटक-सोलापूर परिसरात अनेक झाडे लावून जगविली, त्यानिमीत्त त्यांचा कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करुन शुभेच्छाही दिल्या.
याप्रसंगी विचार व्यक्त करताना परशुराम लांबतुरे यांनी झाडाचे आपल्या आयुष्यातील महत्त्व विषद केले. वाढत जाणारे प्रदूषण, पाणीटंचाई व तापमान यावर मात करायची असेल तर सर्वांनी एक तरी झाड आपल्या परिसरात लावणे व ते जतन करने आवश्यक आहे, असे म्हटले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य जयसिंग गायकवाड विद्यार्थ्यांना 'एक पेड, माँ के नाम' या उपक्रमाची माहिती सांगितली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक शिंदे यांनी केलं तर विष्णू थोरात यांनी सर्व उपस्थितांचं आभार केले.

