उत्तर सोलापूर : तालुक्यातील होनसळ येथील डीएम प्री प्रायमरी, दिलीपराव माने प्राथमिक माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीपराव माने यांचा वाढदिवस शैक्षणिक साहित्य वह्या वाटप, वृक्षारोपण आणि खाऊ वाटप आदी कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अविनाश मार्तंडे हे होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी सभापती संस्थेच्या संचालिका रजनी भडकुंबे ह्या होत्या. उभयतांनी सभापती दिलीपराव माने यांच्या सामाजिक व राजकीय कार्याची प्रशंसा केली व त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष संभाजी भडकुंबे, मार्डी सोसायटीचे चेअरमन बाबासाहेब पाटील, सेवालाल नगर माजी सरपंच संजय वडजे, पृथ्वीराज माने युवा मंचचे सचिव तात्या कदम, होनसळचे माजी सरपंच सुखदेव पवार, राळेराचे सरपंच नागनाथ माने, सोसायटी चेअरमन नागनाथ पवार, नेताजी डांगे, संस्थेचे उपाध्यक्ष अभिजीत भडकुंबे, सचिव विकास बनसोडे, सहसचिव अमित भडकुंबे, संचालक पाटलोजी जानराव यांच्यासह होनसळ राळेरास गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमेश जगताप यांनी केलं. सूत्रसंचालन सचिन नाईकनवरे यांनी तर आभार धर्मदेव शिंदे यांनी मानले. याप्रसंगी मुख्याध्यापक राजेंद्र मोहोळकर शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वृंद, विद्यार्थी उपस्थित होते.
