सोलापूरचे वतनदार देशमुख वाड्यात मानाच्या "श्रीं" ची प्रतिष्ठापना

shivrajya patra

सोलापूर : येथील वतनदार तथा सिद्धेश्वर यात्रेतील प्रमुख मानकरी सोमशंकर देशमुख यांच्या दक्षिण कसबा येथील देशमुख गल्ली येथील देशमुख वाड्यात मानाच्या "श्रीं" ची प्रतिष्ठापना वतनदार सोमशंकर देशमुख, शिला सोमशंकर देशमुख, सुधीर देशमुख, शिल्पा देशमुख, सुदेश देशमुख, शमा सुदेश देशमुख आणि अनिशा देशमुख यांच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात आली.

सोलापूरच्या गणेशोत्सवाला मोठी परंपरा असून येथील वतनदार देशमुखांच्या वाड्यात गेली कित्येक वर्षे मानाच्या देशमुख यांचा गणपती पालखीत विराजमान असतो, ती परंपरा आजतागायत सोलापुरात सुरु आहे.

सोलापूर शहर सार्वजनिक मध्यवर्ती श्रीगणेशोत्सव मंडळाच्या अग्रभागी असलेल्या मानाच्या "देशमुख" यांच्या गणपतीची पालखीतून देशमुख वाड्यात विधिवत पुजन करून विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ करण्याची परंपरा आहे.

देशमुख वाड्यातील "श्री" च्या प्रतिष्ठापनाप्रसंगी ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेतील मानाच्या दुसर्‍या नंदीध्वजाचे मुख्य मास्तर अनंत अंजिखाने, साईनाथ अंजिखाने, श्रीकांत तारा हविनाळ, गजानन धोत्रे आणि परमेश्वर शरणार्थी यांची उपस्थिती होती.


To Top