गंभीर गुन्ह्यांचा तपास अधिक सक्षम व वैज्ञानिक पध्दतीने करण्यास होईल मदत; पोलीस दलात 'फॉरेन्सीक व्हॅन' दाखल

shivrajya patra

सोलापूर : पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये, दाखल होणाऱ्या गंभीर गुन्ह्यांचा तपास अधिक सक्षम व वैज्ञानिक पध्दतीने होण्याकरीता, फॉरेन्सीक वाहनाचे पोलीस आयुक्त एम राज कुमार यांच्या हस्ते बुधवारी, 27 ऑगस्ट रोजी लोकार्पण करण्यात आले.

गुन्ह्याच्या तपासात, तपासी अधिकारी व अंमलदारांना घडलेल्या गुन्ह्यातील पुरावा वैज्ञानिक पध्दतीने गोळा करुन, तो पुरावा आरोपीविरुध्द न्यायालयात सादर करता यावा, यासाठी फॉरेन्सीक वाहन सोलापूर शहर पोलीसांना पुरवण्यात आलं आहे. 

या वाहनामध्ये, घटनास्थळावरील भौतिक पुरावे शोधून, तो वापरण्यासाठी ०६ किट आहेत. त्यामध्ये, ब्लड किट, एनडीपीएस किट, कास्टींग किट, फायर आर्म किट, सायबर किट, तसेच जनरल किटचा समावेश आहे. त्यामुळे आरोपीविरुध्द न्यायालयात अधिक ठोस वैज्ञानिक पुरावे सादर करण्यात येणार आहेत. तसेच या वाहनासोबत ०३ असिस्टंट केमीकल अॅनालायजर, ०३ सायंटीफिक असिस्टंट आणि ०२ चालक असा स्टाफ नियुक्त आहे.

याप्रसंगी पोलीस उप-आयुक्त (मुख्यालय) गौहर हसन, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा) डॉ. अश्विनी पाटील, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजन माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे शाखा) अरविंद माने, सहायक पोलीस निरीक्षक (अंगुलीमुद्रा विभाग) जालींदर गळवे यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी-अंमलदार उपस्थित होते.

To Top