अंजुमन- ए- इस्लाम इंग्लिश मीडियम शाळेत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
सोलापूर : विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम ध्येय निश्चित करणे खूप गरजेचे आहे. आपल्याला काय बनायचे आहे, भविष्यात काय करायचे आहे, हे ठरवून त्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. ध्येय निश्चित असेल, तर वाटचाल करणे खूप सोपे होते. अशावेळी विद्यार्थ्यांनी आपले ध्येय गाठण्यासाठी कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन संस्थेचे को- ऑर्डिनेटर रियाजअहमद पिरजादे यांनी केले.
सिद्धेश्वर पेठ परिसरातील अंजुमाने इस्लाम- साबू सिद्दिक इंग्लिश मीडियम स्कूलच्यावतीने देशाचा 79 वा स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमाने उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथम संस्थेचे लोकल मॅनेजिंग कमिटीचे व्हाईस प्रेसिडेंट हाजी अब्दुल जब्बार शेख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 
प्रमुख पाहुणे म्हणून कार्यालयीन अधीक्षक इम्तियाज हंजगीकर, प्रि. मेअराज करजगीकर, एसी मेकॅनिक इन्स्ट्रक्टर रियाज जमादार यांच्यासह आदीजण उपस्थित होते. को-ऑर्डिनेटर हाजी रियाज पिरजादे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
पिरजादे पुढे म्हणाले, कोणतीही गोष्ट सहज मिळत नाही. त्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. नकारात्मक विचार कमजोर बनवतात, त्यामुळे अभ्यासात नेहमी सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा, हे विचार बळ देतात. याचबरोबर वाईट संगत टाळावी. चांगली संगत योग्य दिशेने घेऊन जाते. 
त्यामुळे चांगल्या लोकांसोबत मैत्री करा आणि त्यांच्याकडून चांगले विचार शिका. वेळेचे व्यवस्थापन करणे खूप महत्त्वाचे आहे. प्रत्येक कामासाठी वेळ निश्चित करा आणि वेळेवर कामे पूर्ण करा. हार मानू नका, असे उपदेशही त्यांनी अध्यक्षस्थानावरुन बोलताना विद्यार्थ्यांना दिला.
प्रथम शिक्षिका रुख्सार शेख यांनी स्वातंत्र्य दिनाबद्दलची विद्यार्थ्यांना माहिती दिली. विद्यार्थी अली रजा, अनाया सरमस्त, मुसद्दिक बागवान, अलिशा बागवान, आयेशा शेख, फैजान नालबंद, अरबी बागवान, शाही अल कबीर, असद सरमस्त, सदफ आलमेलकर, आयेशा कुरेशी यांच्यासह आदी विद्यार्थ्यांनी आपले टॅलेंट आणि कलागुण सादर केले. शिक्षिका साधिका कुरेशी यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक सानिया कुरेशी, रफत शेख, सुल्ताना मुजावर, रुक्साना लालशेरी, फरीदा शेख, रुखैय्या शेख आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.
