स्वातंत्र्य दिन व संत ज्ञानेश्वर महाराज 750 वा जन्मोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांना "पसायदान" प्रत व खाऊ वाटप

shivrajya patra

पंढरपूर शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचा उपक्रम

पंढरपूर : 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त व संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या 750 वा जन्मोत्सवानिमित्त पंढरपूर शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पसायदानाच्याप्रती व खाऊ वाटप करण्यात आले. 

यंदाच्या वर्षी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज 750 वा जन्मोत्सव आहे. हा जन्मोत्सव आपल्या महाराष्ट्र राज्यात सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव म्हणून साजरा केला जात आहे.

शिवसेनेचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेरणेने तथा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांच्या मार्गदर्शनाने पंढरपूर शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचा 11,000 हजार "पसायदान" प्रतीचे शालेय विद्यार्थ्यांना सस्नेह भेट देण्याचा संकल्प केला आहे.

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करत 1, 000 हजार "पसायदान" प्रतीचे शालेय विद्यार्थ्यांना सस्नेह भेट देत सुरुवात करण्यात आली. 

याप्रसंगी शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना पंढरपूर शहर प्रमुख श्रीनिवास उपळकर, समाजसेवक प्रसाद भैय्या कळसे, समाजसेवक गणेश भिंगारे मेंबर, दत्तात्रय वाडेकर, विनायक पिंगळे, नागेश लिगाडे, शेखर कुंदूर, आनंद शिंदे, शंकर क्षीरसागर, विशाल डोंगरे, पिंटू दहिवडकर, हेमंत इंदापूरकर आदी उपस्थित होते.

To Top