सोलापूर : महाराष्ट्र विधान मंडळाच्या विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीचा 19 ते 21 ऑगस्टदरम्यान सोलापूर जिल्हा दौरा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
महाराष्ट्र विधान मंडळाच्या विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीचे प्रमुख आमदार सुहास कांदे असून समीतीचे सदस्य आमदार पुढीलप्रमाणे–रत्नाकर माणिकराव गुट्टे, किर्तीकुमार भांगडिया, उमेश यावलकर, देवेंद्र कोठे, शंकर जगताप, संतोष बांगर, राजू कारेमोरे, मनोज कायंदे, प्रविण स्वामी, अनिल मांगुळकर, ज्ञानेश्वर म्हात्रे, अमोल मिटकरी, धीरज लिंगाडे, सचिन अहिर.
मंगळवारी, 19 ऑगस्ट रोजी सकाळी 9.00 वा. सोलापूर शासकीय विश्रामगृह येथे एकत्र जमणे. 9 ते 9.30 वाजता संबंधित अधिकारी यांचेसमवेत चर्चा करून भेटीचा कार्यक्रम निश्चित करणे व स्थळांना भेटी देण्याकरीता प्रयाण. सकाळी 9.30 ते दुपारी 2.00 वाजता स्थळांना भेटी देणे. दुपारी 2.00 ते 3.00 वाजता राखीव. दुपारी 3 ते 5 वाजता स्थळांना भेटी देणे. रात्रौ- शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे मुक्काम.
बुधवारी, 20 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे सकाळी 10 ते 2 वाजता स्थळांना भेटी देणे. दुपारी 2.00 ते 3.00 वाजता राखीव. दुपारी 3 ते 5 वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय, महानगरपालिका, सर्व नगरपरिषदा व नगरपंचायती, प्रादेशिक परिवहन कार्यालय, औद्योगिक विकास महामंडळ मर्यादित, जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, कृषी अधीक्षक कार्यालय, पशुसंवर्धन कार्यालय, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी व मेंढी विकास महामंडळ, अधीक्षक व कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, सोलापूर यांचे आस्थापनेवरील विमुक्त जाती व भटक्या जमातीचे अधिकारी/कर्मचारी यांची भरती, आरक्षण व अनुशेष तसेच वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ याबाबत बैठक.
गुरुवारी, 21 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते 2 वाजता. जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, जिल्हाधिकारी कार्यालय, जात पडताळणी समिती तसेच जिल्हा परिषद कार्यालय, सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण उपायुक्त/सहायक आयुक्त समाज कल्याण, सोलापूर यांच्या कार्यालयाच्या आस्थापनेवरील विमुक्त जाती व भटक्या जमातीचे अधिकारी/कर्मचारी यांची भरती, बढती, आरक्षण व अनुशेष तसेच विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गाकरीता राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांबाबत जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, सदस्य सचिव जात पडताळणी समिती, स उपायुक्त व सहायक आयुक्त समाज कल्याण यांच्यासमवेत बैठक. दुपारी 2.00 ते 3.00 वाजता राखीव.
दुपारी 3 ते 4.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे समितीने विविध प्रकल्प व कामांच्या केलेल्या पाहणी दरम्यान समितीच्या निदर्शनास आलेल्या काही प्रमुख बाबींसदर्भात संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक
