सोलापूर : सर्वत्र मोबाईलचा बोलबाला आहे, त्यातून लहान मुलां-मुलींना मुक्त करायचे असेल तर वाचन चळवळ हा एक उपायकारक पर्याय आहे, ही चळवळ काळाची गरज आहे. या चळवळीला शिक्षकांनी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य प्रामणिकपणे केल्याने नक्कीच पुढील पिढीतून चांगले साहित्यिक, कवी, लेखक निर्माण होतील, असा विश्वास ज्येष्ठ साहित्यिक अय्यूब अहमद नल्लामंदू यांनी व्यक्त केला.
येथील उर्दू घर येथे नूर सोशल वेल्फेर ट्रस्टच्या माध्यमातून "बेनजीर वाचन चळवळ" च्या वतीने जिल्हा परिषद व खाजगी शाळांच्या मुला-मुलींमध्ये वाचनाची गोडी लावण्यासाठी उर्दू साहित्यातील विविध प्रकारच्या मोफत पुस्तकाचे वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उर्दू-मराठीचे ज्येष्ठ साहित्यिक अय्यूब अहमद नल्लामंदू अध्यक्षस्थानावरून बोलत होते. 
याप्रसंगी विचारपीठावर शहर काझी मुफ्ती अमजद अली, विस्तार अधिकारी दौलतबी शेख, शब्बीर शेख, निलोफर सय्यद, नूर टस्टचे नजीर मुन्शी, इक्बाल अन्सारी, डॉ. शफी चोबदार, डॉ. जैनोद्दीन पटेल, महेमूद नवाज, मुनाफ शेख उपस्थित होते.
"बेनजीर तहरीके मुतालेआ" चे पोस्टरचे प्रकाशन करत कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. प्रारंभी अ. मन्नान शेख यांनी कुराण पठण केले. प्रा. डॉ. शफी चोबदार, प्रा. महेमूद नवाज यांनी सर्व पाहुण्यांचे शाल बुके देऊन स्वागत केले. 
प्रमुख पाहुणे शहर काझी अमजद अली म्हणाले, सु-संस्कृत समाज व पिढी घडविण्यासाठी वाचन संस्कृतीशी विद्यार्थ्यांना जोडण्याचे कार्य नूर ट्रस्टच्या माध्यमातून होत आहे, हे कार्य कौतुकास्पद आहे.
यावेळी शफी कॅप्टन, मजहर अल्लोळी, बशीर बागबान, इम्रान जमादार, अबुबकर नल्लामंदू , मजीद शेख, साहीर नदाफ, सुहेल नाईक, जुबेर जनवाडकर, मसूद सिद्दीकी, अश्रफ पटेल, अख्तर शेख, कलीम भाटगर, अली नल्लामंदू, रिजवान शेख उपस्थित होते. सुत्रसंचालन फहीम बाटघर यांनी केले तर डॉ. शफी चोबदार यांनी सर्व उपस्थितांचं आभार मानले.
