पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील तरुण तडीपार; ०४ वर्षात अनेक गुन्हे दाखल

shivrajya patra

 

सोलापूर : सामान्य नागरीकांना दमदाटी व मारहाण करुन दहशत निर्माण करणे, घातक शस्त्र जवळ बाळगून मारहाण करणे, महिला अत्याचाराचे गुन्हे करणे यासारखे गुन्हे दाखल असलेल्या नबिलाल रजाक शेख या २५ वर्षीय तरूणास पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून दोन वर्षाकरिता तडीपार करण्यात आले असल्याची माहिती जनसंपर्क कक्षातून देण्यात आली.

शेळगी मित्र नगर येथील रहिवासी नबिलाल शेख याच्याविरुध्द विरुध्द सन २०२०, २०२१, २०२४ व सन २०२५ या कालावधीमध्ये वरील नमूद गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. जोडभावी पेठ पोलीस ठाण्याकडून त्याच्या तडीपारीचा प्रस्ताव पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) यांच्याकडं आला होता.

या प्रस्तावाचे अनुषंगाने पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे यांनी २२ ऑगस्ट रोजी च्या आदेशान्वये नबिलाल रजाक शेख (रा. मित्रनगर, शेळगी.) यास सोलापूर व धाराशीव जिल्हा येथून दोन वर्षाकरीता तडीपार केलं आहे. त्यास तडीपार केल्यानंतर विजापूर येथे सोडण्यात आलं असल्याचे सांगण्यात आलंय.

To Top