सोलापूर : डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल अँड कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, सोलापूरच्या विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले असून विद्यार्थ्यांनी एअर पिस्तूल शुटिंग व तायक्वाँडो स्पर्धेत चमकदार कामगिरी बजावली आहे. या यशवंत विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं जात आहे.
या स्पर्धेमध्ये सुवेज सिराज तांबोळी (इ. 06 वी) याने सुवर्ण संकल्प स्पोर्ट्स शूटिंग क्लब, वेलापूर येथे झालेल्या एअर पिस्तूल शूटिंग स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला तर उजेर अफरोज सय्यद (इ. 09 वी) व अल्तमाश अफरोज सय्यद (इ. 10 वी) यांनी तालुका स्तरीय तायक्वाँडो स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून तिघांनीही जिल्हास्तरीय स्पर्धेस पात्रता मिळविली आहे.
प्राचार्य मो. साकीब सय्यद, संस्थापक व विश्वस्त डॉ. असदुल्ला खान तसेच विश्वस्त सादुल्ला खान व इबादुल्ला खान यांनी हे यश संपादन केल्याबद्दल अभिनंदन करून शाळेच्या सर्वांगीण प्रगतीस कटिबद्ध असून शैक्षणिक, क्रीडा व व्यक्तिमत्त्व विकासाच्या सर्व क्षेत्रांत अशीच प्रगती करत रहावे, अशी आशा व्यक्त केली.
