प्रसिध्द भजी घेणे पडले अडीच लाखाला

shivrajya patra

सोलापूर : गर्दीच्या ठिकाणी किरकोळ खरेदीचा मोह लाख मोलाच्या नुकसानीचा ठरू शकतो. ही घटना सराफ कट्ट्यात शुक्रवारी रात्री सुमारास घडली. सराफ बाजारात सुप्रसिद्ध असलेल्या भेळगाडीवर भजी घेण्यासाठी थांबलेल्या शशिकांत बिराजदार यांच्या दुचाकीच्या डिकीतील अडीच लाखाची रोकड अज्ञात चोरट्याने चोरून नेली. 

सोलापुरातील उत्तर कसबा, मसरे गल्लीतील रहिवासी शशिकांत सिद्रामप्पा बिराजदार शुक्रवारी रात्री सराफ बाजारातून जात असताना, पवन कुमार भेळगाडी जवळ भजी घेण्याच्या निमित्ताने थांबले होते. 

ते अॅक्टीवा मोटार सायकल उभी करुन भजी घेण्यासाठी भेळगाडीजवळ गेले असता, अज्ञात चोरट्याने गाडीच्या डिकीची चावी उघडून २,५०,००० रुपयांची रोख रक्कम चोरून नेली.

हा प्रकार लक्षात आल्यावर शशिकांत बिराजदार यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात शनिवारी पहाटे तक्रार दाखल केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक जगताप या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.

To Top