प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये समस्यांचं समाधान शोधण्याची क्षमता निर्माण करण्यासाठी 'अँथे 2025' : दीपक सिक्रोरिया

shivrajya patra

सोलापूर : आकाश एज्युकेशनल सव्हिसेस लिमिटेडचा "अँथे 2025 " आज भारतभरातील विद्यार्थ्यांसाठी संधीचं प्रतीक बनला आहे. मागील 16 वर्षापासून आम्ही हुशार आणि गुणी विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करता यावा, यासाठी आम्ही मदत करीत आलो आहोत, त्यांची आर्थिक पार्श्वभूमी किंवा स्थान कुठलेही असो. ' आकाश ' मध्ये , प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये समस्यांचं समाधान शोधण्याची क्षमता आहे. त्याचा महत्वाचा टप्पा म्हणून राष्ट्रीय स्तरावरील 'अँथे 2025' ला सामोरे जाताना विद्यार्थ्यांसाठी एक संधी असल्याचे आकाश चे असि. डायरेक्टर दीपक सिक्रोरिया यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

शैक्षणिक क्षेत्रातील अत्यंत प्रतीक्षित असलेल्या ' अँथे 2025 चा मूळ उद्देश इयत्ता 05 वी ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने आव्हानांना सामोरे जाण्यास आणि खऱ्या अर्थाने त्यांना येणाऱ्या समस्यांचं निरसन होण्यासाठी सक्षम करणे हा आहे, असं आकाश चे असि. डायरेक्टर दीपक सिक्रोरिया यांनी प्रारंभी पत्रकारांशी बोलताना म्हटले.

इयत्ता 05 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी रूपये 250 कोटींपर्यंत शिष्यवृत्ती (100 टक्के पर्यंत) आणि रुपये 2.5 कोटींचं रोख पारितोषिक जाहीर करण्यात आलं आहे. AESL ने 'आकाश इन्व्हिक्टस एस टेस्ट' लॉन्च केला शिष्यवृत्ती आणि आकाश इन्व्हिक्टस मध्ये प्रवेशासाठी सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. अँथे परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही स्वरूपात 04 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर 2025 दरम्यान होणार असल्याचं असि. डायरेक्टर दीपक सिक्रोरिया यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

आकाशने निश्चित केलेली स्कॉलरशिप Classroom, Aakash Digital आणि इन्व्हिक्टस कोर्सेससाठी दिली जाणार आहे.या वर्षापासून आम्ही 'इन्व्हिक्टस एस टेस्ट' देखील सुरू करत आहोत, जो स्कॉलरशिप आणि आकाश इन्व्हिक्टस कोर्समध्ये प्रवेशासाठी घेतला जाईल. हा कोर्स JEE Advanced च्या तयारीसाठी खास डिझाईन केला असून विद्यार्थ्यांची कोर संकल्पनांवरची पकड आणि परीक्षेची तयारी तपासण्यासाठी तयार करण्यात आला आहे." असंही सिक्रोरिया यांनी पत्रकांशी बोलताना सांगितलं.

अँथे (Aakash National Talent Hunt Examination) 2025 ही जिथे पात्र विद्यार्थ्यांना योग्य साधनं, आधार आणि प्रेरणा दिली जाते, जेणेकरून ते खऱ्या अर्थाने चमकू शकतील. आमचं मजबूत नेटवर्क आणि हायब्रिड शिक्षण पद्धतीमुळे दर्जेदार शिक्षण सर्वांसाठी सुलभ आणि परिणाम केंद्रित बनत आहे, असं सिक्रोरिया यांनी स्पष्ट करताना, अँथे च्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांत अनेक टॉप रैंकर्स घडले आहेत. 2025 मध्ये 10 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली, ज्यामुळे ही भारतातील सर्वात मोठ्या स्कॉलरशिप परीक्षांपैकी एक ठरली आहे. AESL ने यंदाच्या टॉपर्समध्ये NEET च्या टॉप 100 मध्ये 22 विद्यार्थी आणि JEE Advanced 2025 च्या टॉप 100 मध्ये 10 विद्यार्थी हे अँथे द्वारेच पुढे आले असल्याचेही पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

या पत्रकार परिषदेस आकाश एज्युकेशनल सव्हिसेस लिमिटेडचे अकॅडमिक हेड मेडिकल सुनिल राऊत, एरिया बिझनेस हेड इम्रान खान, ब्राँच हेड राहुल बोद्दूल उपस्थित होते.

... 415 हून अधिक आकाश सेंटर्सवर होणार परिक्षा 

ही परीक्षा ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही माध्यमांतून घेतली जाईल, जेणेकरून देशभरातील विद्यार्थ्यांना सोयीस्कर पर्याय मिळेल. अँथे 2025 ची ऑनलाइन परीक्षा 4 ते 12 ऑक्टोबर 2025 दरम्यान होईल आणि विद्यार्थी त्यांना सोयीच्या वेळेत एक तासाचे स्लॉट निवडून परीक्षा देऊ शकतील. ऑफलाइन परीक्षा 5 आणि 12 ऑक्टोबर 2025 रोजी भारतातील 26 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 415 पेक्षा जास्त आकाश सेंटर्सवर होणार आहे.

... इथं अँथे 2025 साठी नोंदणी सुरू 

विद्यार्थी https://anthe.aakash.ac.in/home या वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन नोंदणी करू शकतात किंवा जवळच्या आकाश सेंटरला भेट देऊ शकतात. परीक्षा शुल्क ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्हीसाठी रूपये 300 आहे. लवकर अर्ज करणाऱ्यांना 50 टक्के सूट मिळेल. ऑनलाइन परीक्षेसाठी निवडलेल्या तारखेच्या तीन दिवस आधी आणि ऑफलाइन परीक्षेसाठी सात दिवस आधी अर्ज करणे आवश्यक आहे. प्रवेशपत्र परीक्षा तारखेच्या पाच दिवस अगोदर मिळेल, असंही यावेळी सांगण्यात आलं.

... सर्व निकाल अँथे वेबसाईटवर उपलब्ध

अँथे 2025 चे निकाल टप्प्याटप्प्याने जाहीर होतील इयत्ता 10 वीसाठी 24 ऑक्टोबर 2025 रोजी, इयत्ता 7 वी ते 9 वीसाठी 29 ऑक्टोबर 2025 रोजी, इयत्ता 5वी व 6 वीसाठी 1 नोव्हेंबर 2025 रोजी आणि इयत्ता 11वी व 12वीसाठी 4 नोव्हेंबर 2025 रोजी. सर्व निकाल अधिकृत अँथे वेबसाईटवर उपलब्ध असतील.

... असं असणार परिक्षेचं स्वरूप 

ही परीक्षा एक तासाची असेल आणि त्यात 40 मल्टिपल चॉईस प्रश्न असतील, जे विद्यार्थ्यांच्या वर्ग आणि करिअरच्या इच्छेनुसार असतील. इयत्ता 05 वी ते 09 वीच्या विद्यार्थ्यांसाठी विषय असतील फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथ्स आणि मेंटल अबिलिटी, 10 वीच्या मेडिकल इच्छुक विद्यार्थ्यांसाठी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मेंटल अबिलिटी, तर इंजिनियरिंग इच्छुकांसाठी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि मेंटल अबिलिटी. 11 वी-12वीच्या NEET इच्छुकांसाठी फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी आणि झूलॉजी, तर इंजिनियरिंगसाठी फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स. हे विषय असतील, असंही यावेळी सांगणयात आलं.

...चौकट ...

अँथे मिशन

* हुशार आणि गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत पुरवण्याची परंपरा पुढे सुरू ठेवत, त्यांच्या क्षमतेत आणि संधींमध्ये असलेली दरी भरून काढण्याचा प्रयत्न करत आहे.

* महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना एक ठोस आधार उपलब्ध करून देणे.

* तयारीचं मूल्यांकन करता यावं, म्हणून त्यांना स्टेट रँकसोबत ऑल इंडिया रँकही दिली जाईल.

*****


To Top