मानाचा आजोबा गणपतीचे 12 AM पर्यंत विसर्जन

shivrajya patra
सार्वजनिक मध्यवर्ती श्रीगणेशोत्सव मंडळाच्या बैठकीत लवकर मिरवणुका काढून लवकर संपविण्याचा निर्धार

सोलापूर : येथील सार्वजनिक मध्यवर्ती श्रीगणेशोत्सव मंडळाची मध्यवर्ती मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळांची तातडीची बैठक हाॅटेल ऐश्वर्या येथे पार पडली. या बैठकीत अनेक उत्सव मंडळांच्या मिरवणुक मार्गावर येणाऱ्या अडी-अडचणी ऐकून त्यावर समाधानकारक तोडगा काढण्यात आला. सोलापुरातील मानाचा आजोबा गणपतीचे विसर्जन रात्री 12 वाजेपर्यंत करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.

मिरवणुकीत अग्रभागी असलेल्या मानाचा देशमुखांच्या गणपतीचे देशमुख वाड्यातून दुपारी 01 वाजता मान्यवरांच्या हस्ते पुजन होऊन मध्यवर्ती मिरवणुकीस सुरुवात होईल. त्यानंतर अन्य मंडळे या मिरवणुकीत सहभागी होतील. उत्सव मंडळांनी मिरवणुकीत पारंपारिक वाद्यांसह सहभागी व्हावं, असं आवाहन ट्रस्टी सुनिल रसाळे यांनी केले.

मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या उत्सव मंडळांनी काही अडचणी आल्यास मध्यवर्तीच्या पदाधिकाऱ्यांना कळवाव्यात, त्या सोडविण्याचा मध्यवर्ती प्रयत्न करणार असल्याचे दास शेळके यांनी उपस्थित मंडळांना सूचित केले.

या बैठकीत मानाचा आजोबा गणपती, समर्थ तरुण मंडळ, राणा गणपती, ओम मित्र मंडळ, बाळीवेस गणपती, सरदार गणपती, पाणीवेस तालीम मंडळ, थोरला मंगळवेढा तालीम तरुण मंडळ, सावजी गणपती, राजस्थानी युवक मंडळ या मंडळांची उपस्थिती होती.

यावेळी सार्वजनिक मध्यवर्ती श्रीगणेशोत्सव मंडळाचे उत्सव अध्यक्ष सोमनाथ मेंडके, ट्रस्टी सुनिल रसाळे, दास शेळके, ट्रस्टी माजी आमदार नरसिंग मेंगजी, ट्रस्टी भाऊसाहेब रोडगे, ट्रस्टी संजय शिंदे, ट्रस्टी लता फुटाणे, हेमा चिंचोळकर, ट्रस्टी विजय पुकाळे, ट्रस्टी विष्णु मुधोळकर, ट्रस्टी कैलास मेंगाणे, मल्लिनाथ याळगी, अशोक कलशेट्टी, गणेश चिंचोळी, सोलापूरचे वतनदार सुधीर देशमुख, आजोबा गणपतीचे चंद्रकांत कळमणकर, शिवानंद मेंडके, अनिल सावंत, राहुल कुमणे, पाणीवेस तालीमचे चंद्रकांत वानकर,थोरला मंगळवेढा तालीमचे अमोल शिंदे यांच्यासह या बैठकीत मिरवणुकीत सामील होणारे 30 ते 40 मंडळाचे अध्यक्ष-पदाधिकारी उपस्थित होते.

To Top