जिथं अन्याय तिथं भीम आर्मी संघटन न्याय देण्याचे काम करत राहील : तालुका उपाध्यक्ष युगांतर मेश्राम

shivrajya patra

भीम आर्मी खमारी तर्फे नवनियुक्त तंटामुक्ती अध्यक्ष बालाराम पवनकर यांचा स्वागत

भंडारा : आमच्या संघटनेचे ब्रीद वाक्यच हे आहे की, -"जोर जुल्म की टक्कर में संघर्ष हमारा नारा है" जिल्हा, तालुका अथवा ज्या गावात सामान्य जनतेवर जिथे अन्याय अत्याचार होईल, तिथे-तिथे भीम आर्मी संघटन न्याय देण्याचे काम करत राहील, असं प्रतिपादन भिम आर्मी तालुका उपाध्यक्ष युगांतर मेश्राम यांनी केले.

भंडारा जिल्ह्यातील खमारी (बुटी)तहसील येथील नवनिर्वाचित तंटामुक्ती अध्यक्ष बालाराम पवनकर यांचा रविवारी, 31 ऑगस्ट रोजी भीम आर्मी संघटन जिल्हा भंडारा च्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी तालुका उपाध्यक्ष युगांतर मेश्राम बोलत होते.

यावेळी भीम आर्मीचे भंडारा जिल्ह्याचे जिल्हा संघटक महेंद्र बन्सोड,  भंडारा तालुका उपाध्यक्ष- युगांतर मेश्राम,भीम आर्मीचे कार्यकर्ते असुराज मारवाडे, अजय बन्सोड, राजन उके, जगदीश मोहरकर, पुरुषोत्तम मेश्राम, दिनेश पेशने,अशोक फेंडर आदी भीम आर्मीचे कार्यकर्ते तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

गावात शांतता टिकवून ठेवण्यासाठी आणि गावाला तंटामुक्त करण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहीन, नवनिर्वाचित तंटामुक्ती अध्यक्ष बालाराम पवनकर यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले.

शेवटी भिम आर्मी तालुका उपाध्यक्ष युगांतर मेश्राम यांनी अध्यक्ष पवनकर यांच्या भावी वाटचालीला शुभेच्छा दिल्या.


To Top