एशियन स्पर्धेत चमकलेल्या खेळाडूंचा लोकशाही फाऊंडेशन आणि परफेक्ट वेलनेस सेंटरतर्फे सत्कार

shivrajya patra

सोलापूर : दुबई येथे नुकतीच पार पडलेल्या एशियन स्पोर्ट्स एरोबिक्स चॅम्पियनशिप 2025 ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा विविध सहा आशियाई देशांतील खेळाडूंनी गाजवली. भारताकडून एकूण ४० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये सोलापूरच्या तीन उज्ज्वल खेळाडूंनी आपली छाप पाडली– स्वरा गनेर, हीर गाला आणि अनुष्का चव्हाण अशी या खेळाडूंची नांवं आहेत.

या यशामागे स्ट्रीमलाइन अकॅडमीच्या डॉ. मोहिनी ताकते यांचे प्रभावी मार्गदर्शन आणि खेळाडूंची प्रचंड मेहनत आहे. भारताने या स्पर्धेत एकूण ३० सुवर्ण, २९ रौप्य आणि ३५ कांस्य पदकांची कमाई करून चॅम्पियनशिप ट्रॉफी पटकावली – हे एक अत्यंत अभिमानास्पद यश आहे.

या यशस्वी खेळाडूंचा सत्कार २८ जून रोजी गुरुनानक चौक येथील ऑफिसर्स क्लब, सोलापूर येथे करण्यात आला. लोकशाही फाउंडेशन आणि परफेक्ट वेलनेस सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात खेळाडूंना ट्रॉफी आणि मेडल देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमात लोकशाही फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष वसीमराजा बागवान, शहराध्यक्ष नियाज डोका, ॲड. मुबीन बागवान,ॲड. स्वप्निल कोंडगुळे, संतोष सपकाळ तसेच स्ट्रीमलाइन अकॅडमीच्या डॉ. मोहिनी ताकते मॅडम प्रमुख उपस्थित होते.

... चौकट ...

... हे खेळाडू सोलापूरकरांसाठी प्रेरणास्त्रोत !

"आपण सर्वांनी या यशाचा अभिमान बाळगायला हवा. हे खेळाडू सोलापूरकरांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत. आपण सर्वांनी पुढच्या पिढीला देखील असेच प्रोत्साहन दिले पाहिजे आणि सोलापूरला खेळाच्या क्षेत्रात नवे शिखर गाठण्यासाठी साथ दिली पाहिजे." 

वसीमराजा बागवान, संस्थापक अध्यक्ष,

लोकशाही फाऊंडेशन, सोलापूर.


To Top