सोलापूर : येथील संदेश फाउंडेशन व फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया शाखा सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी, राष्ट्रीय डॉक्टर्स डे, पोस्टमन डे, सीए डे आणि कृषी दिनाचं औचित्य साधत विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करून त्यांच्या सेवा कार्याबद्दल अभिष्टचिंतन करण्यात आले.
साखर पेठ येथील फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखा कार्यालयात आयोजित डॉक्टर्स डे, पोस्टमन डे च्या निमित्ताने त्या-त्या क्षेत्रात कार्यरत असलेल्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संदेश फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सोहेल शेख यांच्यावतीने एफ पी ए आय सोलापूरच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कविता चंडक, सोलापूर महानगरपालिका अंतर्गत नागरी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर योगेश पल्लेलू, निसर्गोपचार तज्ञ डॉक्टर मनोज राठोड आणि पोस्टमन विष्णू विठ्ठल माने तसेच सौ. सायली वेदपाठक यांना शाल, बुके आणि मिठाई देऊन सत्कार करण्यात आला.
डॉक्टर्स डे निमित्त संदेश फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सोहेल शेख यांनी डॉ. मल्लिकार्जुन पोगुल, डॉ. सागर पोगुल, डॉ. उस्मान नल्लामंदु, डॉ. तौहीद खान, डॉ. इस्माईल उटकूर, डॉ. सौ. आस्मा विजापूरे यांच्या कार्यस्थळी क्लिनिकमध्ये जाऊन शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कविता चंडक, डॉक्टर योगेश पल्लेलू, पोस्टमन विष्णू माने, सौ. सायली वेदपाठक यांनी या सत्कार आणि शुभेच्छा प्रित्यर्थ संदेश फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांचं आभार मानले.
फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखा कार्यालयात आयोजित कार्यक्रमाला शाखाधिकारी सुगतरत्न गायकवाड, कार्यक्रम अधिकारी वीरेंद्र परदेशी, ऑप्टो टेक्निशियन किरण कीर्तने, पत्रकार शेख इक्बाल, रमजान मुलाणी, संदेश फाऊंडेशन चे उपाध्यक्ष लक्ष्मण गणपा, सचिव खताल सय्यदखाँ, सदस्य अंबादास महिंद्रकर, लक्ष्मी लोंढे आदी उपस्थित होते.
