पोलीस अधीक्षक कुलकर्णी, जिल्हाधिकारी आशीर्वाद आणि सी.इ.ओ. अधिकारी जंगम यांचा पत्रकार कृती समितीच्या वतीने गौरव !

shivrajya patra

सोलापूर : पंढरपूर आषाढी एकादशीनिमित्त ग्रामीण पोलीस दलाने केलेल्या 'अतुल ' निय कर्तव्याची दखल घेत पत्रकार कृती समितीच्या वतीने युनूस अत्तार व अकबर शेख यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व प्रितम यावलकर यांना टोपी, शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

पंढरपूर आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर पोलीस ग्रामीण विभागाच्या वतीने केलेल्या बंदोबस्ताची माहिती माध्यम प्रतिनिधींना देण्यासाठी, बुधवारी, १६ जुलै रोजी सोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालय संवाद हॉल येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी आषाढी वारीच्या अभषंगाने ग्रामीण भागातील पथकांचे नियोजन, सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियंत्रण आणि वारकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या सोयी-सुविधा अन् उपाय योजनांची सविस्तर माहिती अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली. या पत्रकार परिषदेचे सूत्रसंचालन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी केले. 

याच पत्रकार परिषदेच्या औचित्य साधून पत्रकार कृती समितीच्या वतीने पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी उपाध्यक्ष अप्पा लंगोटे, पत्रकार सैफन शेख, विजयकुमार उघडे, सिद्धार्थ भडकुंबे, सिध्दाराम नंदर्गी यांच्यासह अन्य पत्रकार उपस्थित होते.

...

निमित्त आषाढी वारीच्या उत्कृष्ट नियोजनाचं ! जिल्हाधिकारी आशीर्वाद यांचा पत्रकार कृती समितीच्या वतीने सत्कार

सोलापूर : यंदाच्या आषाढी वारीतील प्रभावी आणि सुव्यवस्थित नियोजनासाठी सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा पत्रकार कृती समिती व अप्पाश्री लंगोटे मित्र परिवाराच्या वतीने मंगळवारी, १५ जुलै रोजी विशेष सत्कार करण्यात आला. जिल्ह्यातील त्यांच्या कार्यकाळातील ही पहिलीच आषाढी वारी असूनही, त्यांनी संपूर्ण यंत्रणा अत्यंत शिस्तबद्ध आणि कार्यक्षमतेने कार्यरत ठेवून कोणतीही समस्या उद्भवू न देता वारकऱ्यांची सेवा केली.

"वारकऱ्यांची सेवा म्हणजेच विठ्ठलसेवा" हे ब्रीद वाक्य घेऊन जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेने एकात्मिकपणे काम करत यंदाची वारी यशस्वी केली. वारीदरम्यान आरोग्य विभाग, बांधकाम विभाग, महिला व बालकल्याण, ग्रामपंचायत, पाणी व स्वच्छता, तसेच ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांच्यावर मोठी जबाबदारी असते. संतांच्या पालख्यांच्या मार्गावर लाखो भाविकांची सोय, स्वच्छता, आरोग्य सुविधा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था यावर विशेष भर देण्यात आला प्रत्येक पातळीवर योग्य समन्वय साधत प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे यंदाची वारी कोणतीही अडचण न निर्माण करता शांततेत पार पडली. 

या निमित्तानं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद  यांचा शाल, मखमली टोपी, बुके व पंढरपूरचं आराध्य दैवत विठ्ठल-रुक्माईची प्रतिमा देऊन सत्कार करून त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.

यावेळी पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष अब्दुल रहिम पठाण, उपाध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे, पत्रकार सैफन शेख, 'जय हो' चे संपादक विजयकुमार उघडे, कार्याध्यक्ष शब्बीर मनियार, सहखजिनदार युनूस अत्तार, अकबर शेख, सिध्दार्थ भडकुंबे, इरफान मंगलगिरी, राम हुंडारे, उपेंद्र गायकवाड, गणेश भालेराव, नितीन करजोळे, रमजान मुलाणी आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.

...

मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचा पत्रकार कृती समितीच्या वतीने सत्कार

सोलापूर : सोलापूर : पंढरपूरची विठुराया भेटीची आषाढी वारी यंदा अधिक सुयोग्य, सुव्यवस्थित व कोणतीही अडचण न निर्माण करता पार पडली, त्याचे श्रेय मुख्यतः जिल्हा परिषद सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या कुशल नेतृत्वालाही जाते. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याचे कौतुक करत पत्रकार कृती समितीच्या वतीने त्यांचा शाल, पुष्पगुच्छ व विठ्ठल-रुक्माईची प्रतिमा देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

मुख्याधिकारी जंगम यांच्या जिल्ह्यातील कार्यकाळातील ही पहिलीच आषाढी वारी असूनही, त्यांनी सर्व यंत्रणा अत्यंत शिस्तबद्ध ठेवत, कोणतीही तक्रार न येऊ देता लाखो वारकऱ्यांना उत्तम सेवा दिली. "वारकऱ्यांची सेवा म्हणजेच विठ्ठलसेवा" या ब्रीदवाक्याला खरं करत जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद यांनी एकात्मिक पद्धतीने उत्कृष्ट कामगिरी केली.

वारी दरम्यान आरोग्य, स्वच्छता, पिण्याचे पाणी, महिला व बालकल्याण, बांधकाम, ग्रामपंचायत व ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांच्या माध्यमातून प्रत्येक स्तरावर प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. त्यामुळे यंदाची वारी कोणतीही अनुचित घटना न घडता अत्यंत शांततेत, भक्तिभावाने व यशस्वीपणे पार पडली.

यावेळी पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष अब्दुल रहिम पठाण, उपाध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे, वरिष्ठ पत्रकार सैफन शेख, 'जय हो' चे संपादक विजयकुमार उघडे, कार्याध्यक्ष शब्बीर मनियार, सहखजिनदार युनूस अत्तार, तसेच रफिक देगनाळकर, कलिम पटेल, अकबर शेख, सिध्दार्थ भडकुंबे, युवराज वाघमोडे, इरफान मंगलगिरी, इक्बाल बागमारु,राम हुंडारे, प्रसाद ठक्का,उपेंद्र गायकवाड, गणेश भालेराव, नुरअहमद तांबोळी, सिकंदर शेतसंदी, इरफान मैंदर्गी, गिरमल्ला गुरव, सिद्धाराम नंदर्गी, गौतम माने, प्रशांत दिलपाक, नितीन करजोळे, साजिद मकानदार आणि इतर पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्याधिकारी कुलदीप जंगम यांचा हा सत्कार केवळ त्यांच्या कार्याचे नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्याच्या विकास व सुयशाचे प्रतीक ठरला आहे. यामुळे जिल्ह्यात अभिमान व गौरवाची भावना निर्माण झाली असून, पुढील कार्यासाठी सर्वच स्तरातून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.

To Top