सोलापूर : ‘महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग २०२५’ या राज्यातील पहिल्या-वहिल्या टेनिस बॉल फुलपीच क्रिकेट स्पर्धेचं आयोजन ०३ ते १० ऑगस्ट दरम्यान दयानंद महाविद्यालयाच्या क्रिडांगणावर करण्यात आलंय. ०२ ऑगस्ट रोजी या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा येथील हरिभाई प्रशालेच्या पटांगणावर होत असून जिल्ह्यातील २० साखर कारखाना संघाने या स्पर्धेत भाग घेतला असल्याची माहिती सिताराम महाराज साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक सुयोग गायकवाड यांनी गुरूवारी, दुपारी एका पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग 2025 म्हणजेच एम एस सी एल 2025 ही फक्त ही केवळ क्रिकेट स्पर्धा नसून सोलापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांना एकत्र आणण्याचा आणि त्याच्यातील त्यांच्यातील ऊर्जा एकोपा आणि क्रीडाभाव वाढवण्याचा एक अभिनव उपक्रम आहे. *'गोडवा साखरेचा आणि जल्लोष क्रिकेटचा'* या संकल्पनेतून स्पर्धा आयोजनाचा विचार पुढं आला. त्यास मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता, येत्या काळात राज्यस्तरावर या स्पर्धेचं करण्यात येईल, असं सुयोग गायकवाड यांनी प्रारंभी म्हटले.
एम एस सी एल 2025 या स्पर्धेच्या अनुषगाने पहिली पत्रकार परिषद गुरुवारी दुपारी झाली. येथील हॉटेल सूर्या एक्झिक्युटिव्हमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये स्पर्धेच्या लोगो चे अनावरण अन् टीझर लाँचिंग करण्यात आले. यावेळी स्पर्धेतील सहभागी संघांची यादी, प्रवेश शुल्क, नियमावलीबरोबर स्पर्धेशी निघडीत महत्त्वाची माहिती महितीही सुयोग गायकवाड यांनी पत्रकारांना दिली.
या स्पर्धेच्या उद्घाटन आणि समारोप सोहळ्याला मराठी सिनेसृष्टीतील काही नामांकित चेहरे तसेच महाराष्ट्राची हास्य जत्रेमधील कलाकारांबरोबरच विविध क्षेत्रातील मान्यवर पाहुणे उपस्थित राहणार असल्याचे सुयोग गायकवाड सांगून, सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे चेअरमन, पदाधिकारी यांनाही निमंत्रणं देण्यात आली आहेत. त्यात अनेकांनी या संकल्पनेचे कौतुक केल्याचंही त्यांनी सांगितले. 
महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग २०२५ ही केवळ एक स्पर्धा नसून, साखर उद्योगातील संघटनशीलता, मैत्रीपूर्ण वातावरण आणि औद्योगिक ऐक्याची नवी दिशा दर्शवणारी एक अभिनव पायरी ठरणार आहे, असा विश्वास सुयोग गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलतांना अखेरीस व्यक्त केला.
या पत्रकार परिषदेला भैरवनाथ शुगरचे कार्यकारी संचालक ऋतुराज सावंत, विविध साखर कारखान्यांचे संचालक, व्यवस्थापकीय संचालक, महाव्यवस्थापक, अधिकारी वर्ग आणि स्पर्धेतील सहभागी सर्व २० संघांचे कर्णधार उपस्थित होते.
⸻
... ही स्पर्धा जिल्ह्याच्या सामाजिक अन् औद्योगिक विकासासाठी एक सकारात्मक पाऊल ठरेल : सुयोग गायकवाड
“या अनोख्या क्रिकेट लीगला सोलापूर जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांचा भरघोस प्रतिसाद लाभला आहे. संचालक, अधिकारीवर्ग, कामगार यांचा उत्स्फूर्त सहभाग या लीगमधून एकात्मता व बंधुभावाचे दर्शन घडवत आहे. ही स्पर्धा केवळ खेळापुरती मर्यादित न राहता, सोलापूर जिल्ह्याच्या सामाजिक आणि औद्योगिक विकासासाठी एक सकारात्मक पाऊल ठरेल.”
*** असा आहे स्पर्धेचा तपशील :
• उद्घाटन समारंभ: २ ऑगस्ट २०२५,
हरिभाई देवकरण प्रशालेचे मैदान, सोलापूर
• स्पर्धेतील सामने: ३ ऑगस्ट ते १० ऑगस्ट २०२५,
दयानंद कॉलेज मैदान, सोलापूर
• स्पर्धा स्वरूप: नॉकआऊट पद्धत
• थेट प्रसारण: विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर
-----
*** अशी आहेत पारितोषिके :
• प्रथम पारितोषिक – ₹३ लाख
• द्वितीय पारितोषिक – ₹२ लाख
• तृतीय पारितोषिक – ₹१ लाख
• मॅन ऑफ द सिरीज – इलेक्ट्रिक स्कूटर
• सर्वोत्तम गोलंदाज व फलंदाज – प्रत्येकी ₹५१,०००
*********
