Photo 1 - दीप प्रज्वलन करताना ऐ . प्रताप रेड्डी , डॉ. राजीव वैशंपायन , डॉ. उमा वळसंगकर, श्री प्रवीणसिंह परदेशी, रंगनाथ बंग, राजेश पटवर्धन, शिरीष गोडबोले,ॲड़वोकेट प्रदीपसिंग राजपूत
सोलापूर : समाजातील गोरगरीब, वंचित रुग्णांना उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा मिळावी, या हेतूने वाडिया हॉस्पिटलची सुरुवात झाली. नूतनीकरण झालेल्या वाडिया हॉस्पिटलमुळे रुग्णकेंद्रित वैद्यकीय सेवेचे ध्येय पूर्ण होईल, असा विश्वास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आर्थिक सल्लागार आणि निवृत्त प्रशासकीय अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांनी व्यक्त केला.
एन. एम. वाडिया चॅरिटेबल ट्रस्ट पुनर्निर्मित वाडिया हॉस्पिटलचे उद्घाटन गुरुवारी मान्यवरांच्या हस्ते झाले. याप्रसंगी व्यासपीठावर पोलीस आयुक्त एम. राज कुमार, बालाजी अमाईन्सचे चेअरमन ए. प्रताप रेड्डी, रंगनाथजी बंग, शिक्षण प्रसारक मंडळीचे पुण्याचे व्यवस्थापन समिती सदस्य सी.ए. राजेश पटवर्धन, संस्थेचे मानद सचिव शिरीष गोडबोले, धर्मादाय उपायुक्त ईश्वर सूर्यवंशी, जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रदीपसिंह राजपूत, डॉ. उमा वळसंगकर, डॉ. राजीव वैशंपायन उपस्थित होते.
प्रारंभी डॉ. विष्णू वैशंपायन यांच्या पुतळ्याला त्यांचे नातू डॉ. राजीव वैशंपायन आणि कुटुंबीयांतर्फे पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर नूतनीकरण केलेल्या वाडिया हॉस्पिटलमधील बाह्य रुग्ण विभागाच्या इमारतीचे उद्घाटन बालाजी अमाईन्सचे चेअरमन ए. प्रताप रेड्डी यांच्या हस्ते, औषधालयाचे उद्घाटन रंगनाथजी बंग यांच्या हस्ते, २० खाटांच्या इनडोअर युनिटचे उद्घाटन शिक्षण प्रसारक मंडळी पुणे चे व्यवस्थापन समिती सदस्य सी. ए. राजेश पटवर्धन यांच्या हस्ते, स्व. डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या प्रेरणेतून साकार झालेल्या सीटी स्कॅन विभागाचे उद्घाटन त्यांच्या पत्नी डॉ. उमा वळसंगकर यांच्या हस्ते, पॅथॅलॉजी विभागाचे उद्घाटन डॉ. राजीव वैशंपायन व वैशंपायन कुटुंबियांच्या हस्ते तर उपहारगृहाचे उद्घाटन हॉस्पिटलच्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना परदेशी म्हणाले, इमारत सोयी सुविधा सुरू करणे सोपे आहे, परंतु ते कायम ठेवणे तुलनेने अवघड आहे. सेवाभावी वृत्तीने काम करणारे डॉक्टर आणि कर्मचारी हे हॉस्पिटलचा कणा असतात. असेच नि:स्पृह वृत्तीचे डॉक्टर आणि कर्मचारी यांना घेऊन नि:स्वार्थ रुग्णसेवेच्या उद्देशाने हे हॉस्पिटल सुरू झाल्यामुळे पुढील पाच वर्षात याचा विस्तार मोठ्या प्रमाणात होईल, असंही प्रवीणसिंह परदेशी यांनी याप्रसंगी सांगितले.
Photo 2 - ओपीडी उद्घाटनप्रसंगी बालाजी अमाईन्स चे चेअरमन ए. प्रताप रेड्डी, डॉ. राजीव वैशंपायन, डॉ. उमा वळसंगकर, प्रवीणसिंह परदेशी, रंगनाथ बंग, राजेश पटवर्धन, शिरीष गोडबोले व इतर मान्यवर
बालाजी अमाईन्सचे चेअरमन ए. प्रताप रेड्डी म्हणाले, सोलापूर आणि परिसरातील रुग्णांच्या सेवेसाठी सुरू होणाऱ्या वाडिया हॉस्पिटलच्या नूतनीकरणाच्या आणि विस्तारासाठीच्या कामात बालाजी अमाईन्स कंपनीला योगदान देता आले त्याबद्दल आम्ही समाधानी आहोत. आगामी काळातही या कामात शक्य तितके योगदान देणार असल्याचे बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक डी. राम रेड्डी यांनी सांगितले.
याप्रसंगी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक सुजित मिश्रा, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, डॉ. वैशंपायन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. ऋत्विज जयकर, सहाय्यक धर्मादाय आयुक्त एस.पी पाईकराव, एस. पी. पाटील, सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक सी. ए. सुनील इंगळे, शहर संघचालक राजेंद्र काटवे, डॉ. अश्विन वळसंगकर, डॉ. उमा प्रधान, भारतीय जनता पार्टी शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, डॉ. अनिल बर्वे, एन. राजेश्वर रेड्डी, ए. श्रीनिवास रेड्डी, विकास शहा, गव्हर्निंग काऊन्सिल सदस्य डॉ. सुनील घाटे, डॉ. सुनील मेहता, वरदराज बंग, वासुदेव बंग, डॉ. शिरीष कुमठेकर, डॉ. राजेंद्र घुली, डॉ. संदीप भागवत, नितीन हबीब, सी. ए. श्रीधर रिसबूड, हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर सोडल, संतोष कुलकर्णी, सोलापूर जनता सहकारी बँकेच्या संचालिका चंद्रिका चौहान, संजय पटेल, कल्पेश जव्हेरी, गिरीश भुतडा, सचिन देशपांडे, पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर, डॉ. विजय कानिटकर, डॉ. आनंद केळकर, आनंद चंदनशिवे, प्रियदर्शन शहा, डॉ. सुमन सरदेसाई आदी उपस्थित होते.
संस्थेचे मानद सचिव शिरीष गोडबोले यांनी प्रास्ताविक केले. मंजुषा गाडगीळ यांनी सूत्रसंचालन तर डॉ. विजय सावस्कर यांनी आभार प्रदर्शन केले. डॉ. किरण पाठक यांनी धन्वंतरी स्तवन गायले.
--------------
चौकट १
अमूल्य अन् सेवाव्रती योजना
वाडिया हॉस्पिटलसाठी काही ज्येष्ठ अनुभवी प्रतिथयश तज्ञ डॉक्टर्स गरजू रुग्णांसाठी अमूल्य सेवा योजनेअंतर्गत दर बुधवारी ९ ते १ यावेळेत विनामूल्य तपासणी करणार आहेत. त्याचप्रमाणे सेवाव्रती योजनेअंतर्गत स्वयंसेवी ज्येष्ठ नागरिक रोज आपला वेळ रुग्णांच्या मदतीसाठी देणार आहेत.
-------------
चौकट २
लवकरच १०० खाटांचा अद्ययावत विभाग
लवकरच एन टी पी सी च्या माध्यमातून आकारात येणाऱ्या इमारतीमध्ये १०० खाटांचा अद्ययावत विभाग व भविष्यामध्ये २५० असे एकूण ३५० खाटांचे भव्य रुग्णालय आणि मेडिकल कॉलेज सुरु करण्याचा संकल्पित मानस आहे, संस्थेचे मानद सचिव शिरीष गोडबोले यांनी याप्रसंगी सांगितले.
